Thu. Jun 13th, 2024
Wheat Cultivation ManagementWheat Cultivation Management

Wheat Cultivation Management: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणास या बातमीत सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना खूपच उपयुक्त ठरणार आहे. सर्व शेतकरी मित्र रब्बी हंगामात सुरुवातीला कापूस पिकाची लागवड करतात. किंवा रब्बी हंगामात काही शेतकरी सोयाबीन पिकाची देखील लागवड करतात. परंतु या पिकापासून मिळालेले उत्पादन संपल्यानंतर खरीप हंगामात अनेक शेतकरी गहू या पिकाची लागवड करतात. यामुळे गहू लागवड कशी करावी याबद्दलची माहिती सर्व शेतकऱ्यांना माहीत असणे खूप गरजेचे आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, गहू लागवड कशा पद्धतीने केले जाते? गहू पिकासाठी किती पाणी देणे आवश्यक असते? गहू पिकामध्ये आंतरपीक घेता येते का? गहू पिकाची लागवड करणे अगोदर शेत जमिनीची मशागत कशा पद्धतीने करावी? गहू पिकावर फवारणी कोणत्या औषधांनी करावी? त्याचबरोबर गहू पिकामध्ये आंतरमशागत कशा पद्धतीने असते? गहू पिकाची वाढ होण्यासाठी किती दिवस लागतात? किंवा गहू पिकाची वाढ होण्यासाठी शेतकऱ्याला विशेष काळजी घ्यावी लागते का? गहू पिकावरील होणाऱ्या किडीचे व्यवस्थापन कसे करावे? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो, समजा एखाद्या शेतकऱ्याने कापूस पिकापासून एका एकर मध्ये चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न घेतले असेल. आणि त्यानंतर कापूस पिकाचे उत्पादन कमी झाले म्हणजेच संपले आणि त्या शेतकऱ्याने कापूस पीक शेतातून काढून टाकून गहू लागवड करण्याचा निर्णय घेतला तर हा निर्णय योग्य राहील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे पाणीसाठा असणे खूप गरजेचे आहे. गहू पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात लागते. यामुळे तुमच्याकडे जर पाणीसाठा चांगल्या पद्धतीचा असेल तर तुम्ही तुमच्या शेतातील कापूस कमी झाले असेल किंवा संपुष्टात आले असेल तर तुम्ही नक्कीच गहू पिकाची लागवड करू शकता.

त्याचबरोबर तुम्हाला जर कापूस पिकातून तीस हजार रुपये उत्पादन मिळाले असेल तर तुम्हाला गहू पिकातून देखील तीस हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळू शकते. मात्र यासाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्याचबरोबर गहू या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागते. यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगामात गहू पीक घेण्या ऐवजी हरभरा, मका, ज्वारी किंवा बाजरी अशा दुसऱ्या पिकांमधून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

गहू पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्याकडे कशा पद्धतीची शेत जमीन असणे आवश्यक आहे. गहू पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्याकडे प्रामुख्याने पाण्याचा निचरा होणारी जमीन असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर गहू लागवड करण्यासाठी खोल जमिनीची निवड करा. त्याचबरोबर तुमच्याकडे जर हलक्या किंवा मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर तुम्ही त्यामध्ये भरपूर प्रमाणात खत घाला. त्याचबरोबर तुम्हाला जर जिराईत गहू पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही जमिनीत पाणी टिकून धरणाऱ्या जमिनीचा गव्हाची लागवड करावी.

त्याचबरोबर मित्रांनो गहू पिकाची पेरणी करण्याची योग्य वेळ कोणती आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात.

गहू पिकाची पेरणी दोन पद्धतीने केली जाते पहिली पद्धत म्हणजेच जिरायत गव्हाची पेरणी आणि दुसरी पेरणी म्हणजे बागायती गव्हाची पेरणी. सुरुवातीला आपण जिरायत पिकाची पेरणी कोणत्या महिन्यात केली जाते याबद्दल माहिती पाहूयात.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जिरायत गव्हाची पेरणी करायचे असेल तर तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या म्हणजेच आठ ते 16 दिवसांच्या दरम्यान जिरायती गव्हाची पेरणी करावी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बागायती गव्हाची पेरणी करायची असेल तर यासाठी तुम्हाला गव्हाची पेरणी कधी करावे म्हणजेच गव्हाची पेरणी कोणत्या महिन्यात करावी हे माहीत असणे खूप गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो, बागायती गव्हाची पेरणी करण्यासाठी योग्य महिना कोणता आहे असा प्रश्न विचारल्यास याचे उत्तर असेल की, बागायती गव्हाची पेरणी करण्याची योग्य वेळ ही नोव्हेंबर च्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्यानंतर पंधरा दिवसांनी करावी. त्याचबरोबर गहू पिकाची पेरणी करण्या अगोदर शेत जमिनीत पूर्व मशागत करून घ्यावी.

गहू पिकाची पेरणी कशा पद्धतीने करावी

गहू पिकाची पेरणी कशा पद्धतीने करावी? हे माहीत असणे खूप गरजेचे असते. आपण जर चुकीच्या पद्धतीने गहू पिकाची पेरणी केली तर आपल्याला उत्पादन कमी मिळू शकते. किंवा एखाद्या वेळेस तोटा देखील होऊ शकतो. यामुळे हे लक्षात ठेवा की, गहू पिकाची पेरणी करण्यासाठी दोन ओळीतील अंतर 22.5 ते 23.0 सेमी. एवढे असावे. त्याचबरोबर मित्रांनो, गहू पिकाची पेरणी ही पाच ते सहा सेमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये.

त्याचबरोबर पेरणी करताना उभी किंवा आडवीच पेरणी करावी उभी आणि आडवी अशी पेरणी करू नये. उभी आणि आडवी पेरणी केल्यानंतर आपल्याला अंतर मशागत करण्यासाठी खूप अडथळे येतात. त्याचबरोबर मित्रांनो पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरणे करावी. अशी पेरणी केल्यामुळे आपल्याला पेरणी बरोबर देण्यात येणारा खताचा पहिला हप्ता गव्हाला देता येईल.Wheat Cultivation Management

त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या जमिनीच्या उतारानुसार 2.5 ते 3 मीटर एवढ्या रुंदीने सरे पाडावेत. त्याचबरोबर आडव्या दिशेने पाठ पाडावेत. यामुळे आपल्याला गव्हाला पाणी देणे सुलभ होते. त्याचबरोबर मित्रांनो आपण केलेल्या गव्हाची पेरणी एका एकर मध्ये जवळपास 22 ते 23 लाख एवढ्या झाडांची असावी. यामुळे आपल्याला एकरी चांगल्या उत्पादन घेता येईल.

त्याचबरोबर मित्रांनो, बागायती गव्हासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये पेरणी करताना एका हेक्टर साठी गव्हाच्या बियाणांची पेरणी ही 125 ते 150 किलो करावी. त्याचबरोबर तुम्ही जर जिरायती गव्हाची पेरणी करत असाल तर यासाठी हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे वापरावेत. त्याचबरोबर जिरायती गावाची पेरणी ही 22.5 सेमी अंतरावर करावी. यामुळे आपल्याला आंतरमशागत करणे सोयस्कर जाते आणि आपल्याला या पद्धतीने केलेल्या पेरणीमुळे जास्त उत्पादन मिळते.

बागायती गव्हाची पेटी करण्यासाठी कोणत्या बियाणांचा वापर करावा.

  1. एचडी 2380
  2. एमएसीएस 2496
  3. एकेएडब्ल्यू 3722 (विमाल)

गहू पिकाची पेरणी केल्यापासून काढणीपर्यंत पाणी व्यवस्थापन कसे असावे?

शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की, गहू पिकाची पेरणी वेळेवर केल्यानंतर गहू पाणी व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीचे असते. त्याचबरोबर तुम्ही जर गहू पिकाची पेरणी वेळेवर केली नाही तर तुम्हाला पाणी व्यवस्थापन देखील वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. शेतकऱ्यांनी आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी वर कसे पाण्याची व्यवस्थापन करायचे? याबद्दल माहिती सांगणार आहोत.

शेतकऱ्यांनो, तुम्ही जर गहू पिकाची पेरणी वेळेवर केले असेल आणि तुम्हाला या गव्हाच्या पेरणीसाठी तुम्हाला पाणी व्यवस्थापन माहिती करून घ्यायची असेल तर हे लक्षात ठेवा की पेरणीनंतर तुमच्याकडे जर एकच वेळेस पाणी देता येईल एवढाच पाणीसाठा असेल तर तुम्ही गव्हाच्या पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी द्यावे.

त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर गव्हाला दोन वेळेस पाणी देता येत असेल तर, गव्हाला पहिले पाणी 20 ते 22 दिवसांच्या दरम्यान द्यावे. आणि दुसरे पाणी हे साठ दिवस ते 65 दिवस या दरम्यान द्यावे. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे पाणीसाठा जास्त प्रमाणात असेल आणि तुम्ही गव्हाला तीन वेळेस पाणी देऊ शकत असाल तर. गहू पिकाला पहिले पाणी हे 20 ते 22 दिवसांनी द्यावे त्यानंतर दुसरे पाणी हे 42 ते 45 दिवसा दरम्यान द्यावे.

आणि मित्रांनो, तुमच्याकडे जर तिसरे पाणी पुरेल इतके पाणी असेल तर 65 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. यामुळे तुमच्या गहू पिकामध्ये चुक चांगल्या पद्धतीने भरतो. आणि तुमच्या गहू पिकाचे उत्पादन जास्त होते.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये वेगवेगळ्या किडीचे प्रादुर्भाव होत असतात. यामध्ये खोडकिडा, तुडतुडे, मावा, वाळवी/ उधई, किंवा उंदीर अशा विविध किडीचा प्रादुर्भाव गहू पिकावर होत असतो. यामुळे कोणत्या किडीचा गहू पिकावर प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखणे खूप गरजेचे असते. हे जर तुम्हाला ओळखू येत असेल तर तुम्ही कृषी सेवा केंद्र मध्ये जाऊन सहज औषधे खरेदी करून त्या प्रदुर्भावावर उपाययोजना करू शकता.Wheat Cultivation Management

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *