Thu. Jun 13th, 2024
Vajan Kami Kranyache UpayVajan Kami Kranyache Upay

Vajan Kami Kranyache Upay नमस्कार मित्रांनो, अनेक नागरिकांचे घरी बसून किंवा दैनंदिन आहाराचे वाढते प्रमाण असल्यामुळे वजन वाढते. परंतु हे वजन कमी कसे करावे? वजन कमी करण्यासाठी घरगुती कोणते उपाय आहेत? केवळ घरी बसून वजन कमी होईल का? वजन कमी करण्यासाठी फक्त चालणे ठीक आहे का? असे अनेक प्रश्न वजन वाढणाऱ्या व्यक्तीच्या मनात पडतात. मात्र केवळ विचार करून चालत नाही. यासाठी कोणती ना कोणती कृती करणे खूप गरजेचे असते. एकदा वजन वाढल्यानंतर ते वजन आपण कमी कसे करावे? त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले वजन कमी होत नाही.

वाढत्या वजनामुळे अनेक व्यक्ती त्रस्त असतात. त्याचबरोबर अनेक जण गुगल वर वजन कमी करण्याचे घरगुती उपाय सांगा? असे टाईप करून अनेक पर्याय पाहतात. मात्र ते पर्याय खरंच आपल्या दैनंदिन जीवनात कसे करायचे पुन्हा असा प्रश्न पडतो? या प्रश्नातच अनेक जण अडकतात आणि वजन कमी करण्याची भानगड सोडून देतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या म्हणजेच टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सहज घरी बसून वजन कमी करू शकता.

वजन कमी करण्याचे कोणकोणते उपाय आहेत? संपूर्ण यादी खालील प्रमाणे

वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. मात्र यामधील काही घरगुती उपाय हे वजन कमी करण्यासाठी मदत करत नाहीत. मात्र ते उपाय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतात. यामुळे वाढत्या वजनाची समस्या नक्कीच तरुण पिढी सोडवू शकते. चला तर मग वाढते वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत पाहूयात…

 1. मध आणि लिंबू पाणी पिल्याने देखील आपले वजन लवकरात लवकर कमी होते.
 2. जिऱ्याचे पाणी हे देखील वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
 3. ओव्याचे पाणी देखील आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
 4. रायता स्वादिष्ट असून हा वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.Vajan Kami Kranyache Upay 
 5. चण्याचे संतु हे देखील वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
 6. पपई खाल्याने देखील वजन कमी होते.
 7. दह्याचे सेवन केल्याने देखील व्यक्तीच्या शरीरातील चरबी कमी होण्यास सुरुवात होते.
 8. आवळा आणि हळद या दोन्ही फळांचे मिश्रण देखील वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
 9. वजन कमी करण्यासाठी किमान थोडा वेळ चालणे खूप आवश्यक आहे.
 10. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात बटाटे, मैदा, तांदूळ आणि साखर अशा पांढऱ्या विविध पदार्थांचे सेवन करू नये.
 11. त्याचबरोबर डाळ, पालक, सफरचंद, गाजर हे पदार्थ खाण्याचा जास्तीत जास्त पदार्थ करा..
 12. त्याचबरोबर बडीशेप पाणी पिणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
 13. काळी मिरी खाल्याने देखील झटपट वजन कमी होते
 14. आल्याचा चहा पिल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते.
 15. हळद दूध पिल्याने देखील वजन कमी होण्यास खूप मदत होते..

वरील दिलेल्या 15 घरगुती उपाय पैकी तुम्ही जर पाच घरगुती उपाय केले तर तुमचे वजन नक्कीच कमी होण्यास मदत होईल. मात्र तुम्हाला या उपायासोबत आहारात काही ठराविक बदल देखील करावे लागतील. म्हणजेच तुम्ही जर आज दोन भाकरी खात असाल तर तुम्हाला त्यामध्ये थोडा बदल करून अर्धी भाकर कमी खावी लागेल. यामुळे तुमच्या पोटात गॅस किंवा पोट फुगल्यासारखे वाटणार नाही.

आणि तुम्ही जर अशा पद्धतीने महिनाभर मेहनत घेतली तर तुम्हाला नक्कीच महिन्याभरात फरक कळेल महिनाभरात तुमचे वजन जास्त कमी होणार नाही मात्र किमान पाच किलो वजन नक्की कमी होईल. त्यानंतर तुम्ही महिन्याभरानंतर म्हणजेच दीड भाकरी वरून एक भाकरीवर किंवा त्यापेक्षा थोडी जास्त खा. यामुळे तुमचे पुढील महिन्यात झटपट वजन कमी होईल. आणि तुम्हाला हलके वाटण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर तुम्ही जर दुसऱ्या महिन्यात देखील ही प्रोसेस फॉलो केली तर दुसऱ्या महिन्यात तुमचे वजन तब्बल सात ते आठ किलो कमी होऊ शकते.

मात्र, तुम्हाला यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि जेवण केल्यानंतर दररोज किमान 1000 ते 2000 पावले चालावी लागतील. यामुळे तुम्ही केलेले जेवण व्यवस्थित पचन होईल. आणि तुमचे वजन जास्त जास्त कमी होण्यास मदत होईल.

वरील उपाय करूनही तुमचे वजन कमी झाले नाही तर तुम्ही दररोज किमान सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळी तब्बल पाच हजार ते दहा हजार पावले चालणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला थोडाफार थकवा जाणवेल त्याचबरोबर तुम्हाला चढवल्यानंतर नक्कीच आराम मिळेल. मात्र तुम्ही जरा आहारावर नियंत्रण ठेवले तर तुमचे वजन झटपट कमी होईल.

मध आणि लिंबू पाणी यामुळे आपले वजन कसे नियंत्रणात राहते?

मित्रांनो तुम्ही देखील हा उपाय पहिल्यांदी कधी ना कधी ऐकला असेल, मात्र तुम्हाला या उपायावर जास्त प्रमाणात विश्वास बसलेला नसेल. परंतु हे लक्षात घ्या की हा उपाय देखील तुमचे वजन कमी करण्यास खूपच उपयुक्त आहे. मध आणि लिंबू पाणी वजन कमी करण्यास कसे मदत करते? त्याच बरोबर मध आणि लिंबू पाणी कसे प्यावे याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूयात…

मध आणि लिंबू पाणी कसे प्यावे? आणि कधी प्यावे? मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यानंतर दररोज मध आणि लिंबू पाणी पिऊ शकता. हे बनवताना तुम्हाला एक पाव तुकडा लिंबाचा रस एका ग्लासामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर त्या ग्लासामध्ये एक चमचाभर मध टाकायचा आहे. त्यानंतर मध आणि लिंबाचा रस चांगल्या प्रमाणात मिक्स करायचा आहे. त्याचबरोबर याच प्रमाणात तुम्हाला रोज सेवन करावे लागेल. त्यानंतर यामुळे तुम्हाला वजन कमी होण्यास मदत होईल.

जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी कसे होते?

मित्रांनो, जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यास खूपच उपयुक्त आहे. फक्त जिऱ्याचे पाणी कधी आणि कसे प्यावे हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो जिऱ्याचे पाणी पिण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही एक चमचा जिरे टाक आणि ते जिरे पाणी रात्रभर भिजवू द्या. त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर हे जिऱ्याचे पाणी उपाशीपोटी सेवन करा. त्याचबरोबर हे पाणी पिल्याने तुमचे वजन नक्कीच कमी होईल आणि त्याचबरोबर तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील हे पाणी खूपच फायदेशीर राहील.

ओव्याचे पाणी पिल्याने आपले वजन कसे कमी होते?

ओव्याचे पाणी हे खूपच उपयुक्त आहे. त्याचबरोबर ओवा हा आपल्याला सर्दी झाल्यानंतर देखील वापरता येतो. त्याचबरोबर या ओव्यामुळे आपले वजन देखील झटपट कमी होण्यास मदत होते. ओव्याचे पाणी कसे आणि कधी प्यावे याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहुयात…

ओव्याचे पाणी पिण्यासाठी सर्वप्रथम रात्री एक ग्लासात पाणी घ्या. आणि त्या ग्लासात एक चमचा ओवा टाका. आणि हे ओवा पाणी रात्रभर भिजू द्या. आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी गॅसवर ठेवून उकळवा. त्यानंतर हे पाणी कोमट होस्तर थांबा. त्यानंतर हे पाणी चाळणीने चाळून प्या.. त्याचबरोबर मित्रांनो या पाण्याने देखील तुमचे वजन कमी होण्यास खूपच मदत होईल.

टीप. त्याचबरोबर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की वरीलपैकी दिलेल्या उपायाचा अवलंब करणे अगोदर तुम्ही तुमच्या घरगुती डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा. आणि त्याचबरोबर वर दिलेल्या तीन उपायांपैकी कोणत्याही एका उपायाचे पाणी सकाळी प्या. तीनही पाणी एका वेळेस पिऊ नये त्याचबरोबर पाणी पिणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि लवकर वजन कमी होण्यासाठी चालणे खूप गरजेचे असते. आपण दररोज सकाळी आणि सायंकाळी चालणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर किमान 1000 ते 2000 पावले घरातली घरात चालणे देखील आवश्यक आहे. आपण जर जेवल्या जेवल्या थोडे चाललो तर आपले वजन नक्कीच कमी होईल..Vajan Kami Kranyache Upay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *