Mon. Jun 10th, 2024
Tur Lagavd MahitiTur Lagavd Mahiti

Tur Lagavd Mahiti: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. या बातमीत आपण तूर लागवड कशा पद्धतीने करावी? तूर लागवड करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या पद्धतीचे जमीन असावी? तुर पिकापासून आपण किती उत्पादन घेऊ शकतो? तुर पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण माहिती? तूर लागवडीसाठी किती खर्च येतो? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल की तुमच्या आजूबाजूचे किंवा दुसऱ्या गावातील शेतकरी तूर पिकाची लागवड करून चांगल्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. आणि तुम्हालाही तुर पिकातून उत्पादन कसे घ्यायचे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. या बातमीत आम्ही तुर पिकाची लागवड ते तुर पिकाची काढणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगणार आहोत. यामुळे ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की, कोणतेही पीक आपल्याला घ्यायचे असल्यास आपल्याकडे जास्त प्रमाणात किंवा थोड्या का होईना प्रमाणात पाणी असणे खूप गरजेचे असते. मात्र या तुर पिकाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. केवळ पावसाच्या पाण्यावर देखील तूर पिकातून शेतकरी उत्पादन घेऊ शकतात.

मात्र तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल तर तुमचे उत्पादन नक्कीच जास्त होऊ शकते. त्याचबरोबर तूर पिकाला इतर पिकापेक्षा जास्त खर्च करण्याची देखील आवश्यकता नसते. तुर पिकाला देखील महाराष्ट्रामध्ये नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकातून देखील हजारो शेतकरी चांगला नफा कमवत आहेत. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन तसेच कांदा पीक घेणे सोडून अनेक शेतकरी तुर पिकातूनच नफा कमवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचबरोबर यावर्षी तुर पिकाला तब्बल नऊ हजार रुपये ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला आहे. यामुळे यावर्षी तुर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्याचबरोबर यावर्षी तुर पिकाचे बाजार भाव अजून वाढतील अशी देखील अपेक्षा शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. मात्र यावर्षी कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना शेतकऱ्यांच्या मनायोग्य बाजारभाव मिळालेला नाही. यामुळे कापूस तसेच सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच तोट्याचा सामना करावा लागला आहे.

तुर पिकाची लागवड कोणत्या जमिनीत करावी

शेतकरी मित्रांनो, तुर पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याकडे जास्त चांगल्या क्वालिटीची जमीन असणे गरजेचे नाही. मात्र आपल्या जमिनीत जे पावसाचे पाणी येत असते त्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीचा होवा अशी जमीन शेतकऱ्याकडे असणे खूप गरजेचे असते. तुमच्याकडे देखील उत्तम निजरा होणारी शेतजमीन असेल तर तुम्ही नक्कीच तुर पिकाचे उत्पादन घेऊन चांगला नफा कमवू शकता.

त्याचबरोबर कोणत्या जमिनीत तुर पिकाची उत्पादन चांगले येत नाही. याची देखील माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया. तूर पिकासाठी अनेक जमिनी शेतकरी वापरतात मात्र काही शेतकऱ्यांना जास्त अभ्यास नसल्यामुळे माहीत नसते की या जमिनीत हे पीक घेतल्यावर जास्त उत्पादन निघू शकत नाही. हे लक्षात ठेवा की, तूर पिकाचे उत्पादन चोपण जमीन, क्षारयुक्त जमीन तसेच पाणथळ जमीन या शेत जमिनीत तुर पिकाची लागवड करून शेतकरी चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकत नाहीत. त्याचबरोबर या जमिनीत जर शेतकऱ्याने तूर पिकाची पेरणी केली तर शेतकऱ्याला तोटा देखील होऊ शकतो.

तुर पिकाची पेरणी कधी करावी

तुर पिकाची लागवड म्हणजेच पेरणी कधी म्हणजेच कोणत्या महिन्यात करावी याची योग्य माहिती असणे देखील खूप गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, पावसाळा हा जून महिन्यात सुरू होतो. या महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्याच्या भागात कडाक्याचा पाऊस होतो. आणि हा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये वापसा होण्यासाठी जवळपास सात ते आठ दिवस लागतात. आणि पुन्हा पाऊस आल्यानंतर जमिनीचा वापर होणे पुन्हा लांबते. यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत ज्या दिवशी वापसा होईल त्या दिवशी तूर पिकाची पेरणी म्हणजेच लागवड करणे योग्य राहते.

किंवा तुम्ही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील तुर पिकाची पेरणी करू शकता. म्हणजेच हे लक्षात ठेवा की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही तुर पिकाची पेरणी करू शकता.

तुर पिकाच्या कोणत्या जातीची पेरणी करावी

तुर पिकाच्या कोणत्या जातीपासून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते? त्याचबरोबर तूर पिकाची कोणत्या जातीची लागवड केल्यानंतर ते तूर पिक किती दिवसांनी काढण्यासाठी तयार होते. असे संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात.

आय. सी. पी. एल-87 या तुर पिकाच्या जातीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला प्रति हेक्टर जास्तीत जास्त अठरा ते वीस किलोमीटर उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर या मानाची लागवड केल्यानंतर तुरपे 120 ते 130 दिवसांनी काढण्यासाठी तयार होते.Tur Lagavd Mahiti

विपुला- या तुर पिकाच्या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. या तुर पिकाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला प्रति हेक्टर जास्तीत जास्त 24 ते 26 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. त्याचबरोबर केवळ 150 ते 170 दिवसात शेतकऱ्याला हे उत्पादन मिळू शकते.

बी. डी. एन. – 711 या तुरीच्या जातीच्या पिकाची लागवड केल्यानंतर देखील शेतकऱ्याला चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते. या जातीची निवड केल्यानंतर शेतकरी जास्तीत जास्त अठरा ते वीस किलोमीटर पर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन घेऊ शकतात. त्याचबरोबर हे पीक काढण्यासाठी 150 ते 160 दिवसात तयार होते.

त्याचबरोबर वरील दिलेल्या सर्व सुधारित तुरीच्या जाती आहेत. या जातीला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर या जातींच्या तुर पिकांवर जास्त प्रमाणात रोगाचा प्रदुर्ग होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च कमी होतो. त्याचबरोबर या पिकाची वाढ देखील का पटापट होते.

तुर पिकांमध्ये कोणते अंतर पीक घेता येते

शेतकऱ्या मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न नक्की पडला असेल की तूर पिकामध्ये आपण कोणकोणत्या आंतर पिकाची लागवड किंवा उत्पादन घेऊ शकतो?. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आपण पुढील प्रमाणे पाहुयात… शेतकऱ्यांनो तुर पिकाची लागवड केल्यानंतर या पिकामध्ये तुम्ही मूग, उडीद, सोयाबीन आणि तसेच ज्वारी अशा विविध पिकांची लागवड करून उत्पादन घेऊ शकता.

तुर पिकाची लागवडीचे अंतर.

तुर पिकाची लागवड करण्यासाठी किती अंतर सोडावे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो? मात्र या प्रश्नाचे उत्तर अनेक वेळा वेगवेगळ्या उत्तर मिळतात. यामागील कारण म्हणजे दोन पिकाच्या जातीनुसार तुर पिकातील अंतर ठेवले जाते.

शेतकऱ्यांना तुम्ही जर आय. सी. पी. एल – 87 या लवकर उत्पादन देणाऱ्या जातीची लागवड करत असाल तर तुम्हाला 45 बाय 10 सेमी या पिकांमध्ये अंतर ठेवावे लागेल.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर मध्यम कालावधीमध्ये उत्पादन देणाऱ्या तूर पिकाच्या जातीची लागवड करण्यासाठी निवड केली असेल तर लागवडी दरम्यान तुर पिकांमधील अंतर हे 60 बाय वीस सेमी असावे. किंवा तुम्ही 90 बाय 20 सेमी अंतर देखील तुर पिकाची लागवड करताना ठेवू शकता.

तुर पिकासाठी खत व्यवस्थापन कसे असते

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुर पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर, तुम्हाला तुर पिकाची लागवड करण्या अगोदर म्हणजेच उन्हाळ्यामध्ये एक हेक्टर साठी पास्ट शेणखत टाकावे लागेल. त्याचबरोबर मित्रांनो हे शेणखत चांगल्या प्रमाणात कुजलेले असावे याची काळजी घ्यावी. तुम्ही जर चांगले खुजलेले पाच टन एक हेक्टर मध्ये शेणखत टाकले तर तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते.

त्याचबरोबर मित्रांनो सलग तुरीसाठी तुम्ही पेरणी वेळी 25 किलो नत्र आणि 50 किलो सपूरांद टाकावे.

तुर पिकांमध्ये अंतर मशागत कशी असावी?

तुर पिकामध्ये अंतर मशागत वेळोवेळी करणे खूप गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो तुम्ही तुर पिकाची लागवड केल्यानंतर जवळपास वीस ते 25 दिवसांनी विरळणी करून घ्या.

पेरणी केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पहिली कोळपणी करा आणि त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी दोन ते तीन कोळपणी करणे आवश्यक असते. त्याचबरोबर तुमच्या शेतात उगलेल्या तनानुसार तुम्ही कोळपणी करू शकता.Tur Lagavd Mahiti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *