Fri. Feb 16th, 2024
Strawberry Cultivation InformationStrawberry Cultivation Information

Strawberry Cultivation Information: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत स्ट्रॉबेरी पिकाची लागवड कशा पद्धतीने केली जाते? त्याचबरोबर या पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असते? या पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे? स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी सुरुवातीला कशा पद्धतीची मशागत करावी? स्ट्रॉबेरी पिकावर कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी? याबद्दल अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यासाठी कोणत्या जमिनीची निवड करावी? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे ( Strawberry Cultivation Jamin Nivad)

तुम्हाला जर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर तुमच्याकडे पाण्याचा निचरा व्यवस्थित असणारी हलक्या पद्धतीची जमीन असावी. त्याचबरोबर तुमच्याकडे जर पाण्याचा निचरा होणारी आणि मध्यम काळ्या स्वरूपाची जमीन असेल तर ती देखील जमीन स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खूपच उपयुक्त मानली जाईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीचा आम्ल- विम्ल निर्देशांक हा 5.5 ते 6.5 याच दरम्यान असणे आवश्यक आहे. कारण हा निर्देशांक खूपच योग्य मानला जातो…

मित्रांनो वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर जमीन असेल तर ही जमीन स्टोबेरी लागवडीसाठी खूपच योग्य मानली जाते. यामागील कारण म्हणजेच या जमिनीत स्ट्रॉबेरी रोपांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर या जमिनीत स्टोबेरी रोपांची मुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात खोल जातात. यामुळे आपण जर स्ट्रॉबेरी पिकाला जास्त पाणी नाही दिले तरीदेखील आपल्याला जास्त उत्पन्न मिळू शकते…

स्ट्रॉबेरी पिकाच्या कोणत्या जातीची लागवड करावी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

शेतकरी मित्रांनो स्टोबेरी या पिकातून आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आपण स्ट्रॉबेरी पिकाच्या योग्य जातीची निवड करणे देखील खूप गरजेचे असते. आपण जर स्ट्रॉबेरी पिकाच्या योग्य जातीची निवड केली नाही तर आपल्याला स्ट्रॉबेरी पिकातून तोटा देखील होऊ शकतो. यामागील कारण म्हणजे आपण जास्त दिवस मेहनत घेतो आणि स्ट्रॉबेरी पिकातून जर चांगले उत्पादन मिळाले नाही तर आपल्याला नक्कीच तोटा होऊ शकतो. यामुळे तुम्ही खाली दिलेल्या सुधारित जातींपैकी कोणत्याही स्ट्रॉबेरी जातींची निवड करू शकता.

आपल्या महाराष्ट्रात कोणत्या स्ट्रॉबेरी जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्याचबरोबर या लागवडीतून शेतकरी किती प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहूया…

तर महाराष्ट्रामध्ये स्वीट चार्ली, सेलवा, कॅमारोझा , रांगिया, फेस्टिवल, विंडर डॉन, केलंजंट अशा इत्यादी स्ट्रॉबेरी जातींची लागवड करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादन घेतात. तुम्ही देखील वरील प्रमाणे दिलेल्या जातीच्या कोणत्याही स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगल्या प्रमाणात बदल घेऊ शकता.

स्ट्रॉबेरी लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागत कशा पद्धतीचे करावी? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाची लागवड करायची असल्यास आपली जमीन भुसभुशीत असणे खूप गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो आपली जमीन जर भुसभुशीत असेल तर आपण कोणत्याही पिकाची लागवड केल्यानंतर त्या पिकाची वाढ लगेच सुरू होते. त्याचबरोबर त्या पिकाची मुळे जमिनीमध्ये सहजरीत्या आतमध्ये जातात. यामुळे आपल्याला पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. यामुळे आपण स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्या अगोदर देखील पूरमशाबत करणे खूप गरजेचे असते. चला तर मग स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्याअगोदर पूर्व मशागत कशा पद्धतीचे करावी याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहूया..

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करायची असेल तर तुम्हाला उन्हाळ्यामध्येच पूर्व मशागत करावी लागेल. शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या शेतजमिनीची उभी आणि आडवी खोलवर नांगरट करून घ्या. त्याचबरोबर नांगरट केल्यानंतर तुमच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ढेकळांची संख्या असेल तर तुम्ही त्या ढेकांना फोडण्यासाठी रोटर देखील मारू शकता. यामुळे तुमची शेतजमीन भुसभुशीत होईल.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असलेले जे तन आहे. त्याला एकत्र गोळा करून त्याला नष्ट करावे. कारण असे अनेक तन आहेत जे उन्हाळ्यामध्ये वाळून जातात परंतु पावसाळ्यामध्ये लगेच हिरवेगार होतात आणि आपल्या पिकांना मोठे होण्यापासून रोखतात. यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये त्या तणाची विल्हेवाट लावणे खूप गरजेचे असते.

त्याचबरोबर तुम्हाला जर पुढील वर्षी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही मागील वर्षीच घेत असलेल्या पिकाला हेक्टरी तब्बल आठ ते दहा टन शेणखत वापरावे. यामुळे आपली स्ट्रॉबेरी चांगल्या प्रमाणात वाढू शकते. त्याचबरोबर या शेण खतामुळे आपल्याला स्ट्रॉबेरी पिकाला जास्त प्रमाणात सेंद्रिय खत देण्याची आवश्यकता नाही लागणार.

स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कोणत्या पद्धतीने करावी? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे ( Strawberry Cultivation Ropnchi nivad)

स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यासाठी आपण कशा पद्धतीच्या रोपांची निवड करावी हे माहीत असणे देखील खूप गरजेचे असते. कारण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीच्या रोपांची लागवड केली तर तुम्हाला नक्कीच स्टोबेरी पिकातून तोटा होऊ शकतो. यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरी पिकांच्या रोपांची लागवड कशा पद्धतीची करावी याची माहिती घेणे गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो स्टोबेरी पिकाची लागवड करण्यासाठी स्ट्रॉबेरी पिकाची रोपे एकसारख्या समानवाढीची असावीत. त्याचबरोबर त्या रोपांना किमान चार ते पाच पाने आलेली असावीत.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही घेतलेल्या स्ट्रॉबेरी रोपांची पाने सर्व निरोगी आहेत का नाही हे नक्की बघा. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी पिकांच्या पानांचा रंग गर्द हिरवा असावा.Strawberry Cultivation Information

त्याचबरोबर तुम्ही घेतलेल्या स्ट्रॉबेरी पिकाच्या रोपांना फुलधारणा झालेली नसावी. हे देखील आपल्या स्ट्रॉबेरी रोपांसाठी खूपच महत्त्वाचे आहे;

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही घेतलेल्या स्ट्रॉबेरी रोपांची मुळे ही पांढऱ्या रंगाची आणि लांब लांब असावेत.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही रोपवाटिकेतून घेऊन येत असलेल्या स्ट्रॉबेरी रोपे हे प्लास्टिकच्या पिशवीत वाढलेली असावीत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर स्ट्रॉबेरी रोपे हे जमिनीतून खोदून घेऊन जात असाल तर स्ट्रॉबेरी रोपे जमिनीतून काढण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

म्हणजेच स्ट्रॉबेरी रोपे खोदून काढताना आपण स्ट्रॉबेरी पिकांच्या मुलांना कसल्याही पद्धतीची विजा होऊ द्यायची नाही. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी पिकाच्या रोपांची मुळे जर खुजलेली असतील तर ते रोप घेऊ नका.

स्ट्रॉबेरी पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असावे? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे ( Strawberry Cultivation Pani Mahiti)

शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाची लागवड केली तरी देखील आपल्याला त्या पिकाला पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर आपण जर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करत असाल तर या स्ट्रॉबेरी पिकाला देखील पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते.. स्ट्रॉबेरी पिकाला सिंचन पद्धतीने म्हणजेच ठिबक सिंचन ने पाणी दिले जाते.

यामुळे स्ट्रॉबेरी पिकावर जास्त प्रमाणात रोगराई येत नाही. त्याचबरोबर आपल्या शेत जमिनीमध्ये जास्त प्रमाणात तन होत नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण घेत असलेल्या ठिबक सिंचनामध्ये 16 मीमीच्या एक -दोन पार्श रेषा त्याच बरोबर मित्रांनो प्रत्येक 30 सेमी अंतरावर ड्रीपर सह दोन ते चार लिटर तास डिस्चार्ज असावा.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोणत्या ऋतूमध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली जाते? याबद्दलची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे…

शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या हवामान असते. यामुळे एकाच ऋतूमध्ये सर्वच ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली जात नाही. यामुळे वेगवेगळ्या राज्यात स्ट्रॉबेरी पिकाची वेगवेगळ्या वेळेवर लागवड केली जाते.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागवड ही ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यादरम्यान केली जाते. त्याचबरोबर भारताच्या ईशान्य बाजूला स्ट्रॉबेरी पिकाची लागवड ही नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत केली जाते. त्याचबरोबर मित्रांनो, उत्तर भारतामध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड ही सप्टेंबर महिन्यात पासून जानेवारी महिन्यापर्यंत केली जाते. आणि दक्षिण भारतामध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड ही जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत केली जाते.

म्हणजेच तुम्ही कोणत्या राज्याचे शेतकरी आहात त्यानुसार तुम्ही तुमच्या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करू शकता.Strawberry Cultivation Information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *