Thu. Jun 13th, 2024
Remedy for headacheRemedy for headache

Remedy for headache: नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत की लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास सतत होत असतो. त्याचबरोबर अनेकांना शिल्लक कारणावरून डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. तर काही व्यक्तींना वर्षानुवर्ष डोकेदुखीचा त्रास होत नाही. परंतु एखाद्या व्यक्तीला महिन्यातून दोन ते तीन वेळा डोकेदुखी मुळे हॉस्पिटलमध्ये जावे लागते. यामुळे अनेक जण डोकेदुखी मुळे त्रस्त होऊन बसतात. आज अशा व्यक्तींसाठी आम्ही खूपच सोपे आणि डोकेदुखी पासून सुटका होणारे उपाय सांगणार आहोत. हे उपाय पाहून तुम्हाला नक्कीच डोकेदुखीला फायदा होईल.

डोकेदुखी हा गंभीर आजार नाही? असे सर्वजणांना वाटते. परंतु ज्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो त्या व्यक्तीसाठी हा आजार खूपच भयंकर आहे असे वाटते. कारण ज्याची डोके दुखते त्या व्यक्तीला खूपच डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर अनेक वेळा त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे जावे लागते. परंतु अनेक जण घरगुती उपायाने देखील डोकेदुखीवर मात करतात.

डोकेदुखी झाल्यानंतर डोक्याला झेंडू बाम लावावे प्यावे

थोडक्यात डोकेदुखीवर कोणकोणते उपाय केल्याने डोकेदुखी पासून आपल्याला सुटका मिळू शकते. याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूयात. डोकेदुखीवर लहानापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत वापरला जाणारा घरगुती उपाय म्हणजेच झेंडू बॉम्ब हा जरी झेंडू बाम दुकानातून आणलेला असला. तरी देखील हा उपाय घरगुती उपाय मानला जातो. कारण हा झेंडू बाम आपण मेडिकल मधून कमी पैशांमध्ये विकत घेऊन येतो. परंतु या झेंडूबाममुळे आपल्याला अनेक आजारापासून सुटका होते. सर्दी असो किंवा खोकला किंवा डोकेदुखी अशा विविध आजारांपासून झेंडू बाम आपल्याला मदत करतो. त्याचबरोबर सर्वांच्याच घरात झेंडू बाम ठेवला जातो.

डोकेदुखी सुरू झाल्यानंतर अद्रकीचा चहा प्यावे

त्याचबरोबर मित्रांनो, डोकेदुखी सुरू झाल्यानंतर अनेक जणांना आल्याचा चहा म्हणजेच अद्रक टाकून चहा पिऊ वाटतो. त्याचबरोबर हा चहा पिल्यानंतर अनेकांना डोकेदुखी पासून सुटका देखील होते. यामागील कारण म्हणजेच अद्रक मध्ये डोकेदुखी विरोधात गुणधर्म असतात. त्याचबरोबर अद्रकीचा चहा योग्य पद्धतीने करणे देखील खूप महत्त्वाचे असते.

डोकेदुखी झाल्यानंतर अद्रकीचा चहा कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. सर्वप्रथम एखाद्या पातील्यात दोन कप भरून पाणी घ्या त्यानंतर त्या पाण्यात अद्रक टाका अद्रक टाकल्यानंतर पाणी उकळू द्या पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पती, साखर आणि शेवटी दूध टाका. त्यानंतर पुन्हा चहा उकळू द्या. आणि थोड्या प्रमाणात चहाला कमी गॅसवर घटू द्या. यामुळे अदकीमध्ये असलेले गुणधर्म चहा मध्ये पूर्णपणे मिक्स होतात. आणि या पद्धतीने केलेला चहा पिल्याने डोकेदुखीचा त्रास अनेक व्यक्तींना बरा करण्यास मदत करतो.

डोकेदुखी सुरू झाल्यानंतर सफरचंद खावे

डोकेदुखी झाल्यानंतर अनेक जण सफरचंद देखील खातात. त्याचबरोबर किरकोळ प्रमाणात डोकेदुखी झाल्यानंतर सफरचंद खा असा सल्ला देखील डॉक्टर अनेक जणांना देतात. सफरचंद खाल्ल्याने अनेक रोग त्याचबरोबर आजार आपल्या शरीरापासून लांबच राहतात. यामुळे असे देखील म्हणले जाते की, दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून लांब राहा… याचा अर्थ असा की सफरचंद मध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. यामुळे आपण दिवसातून एक तरी सफरचंद नक्की खावे.Remedy for headache

त्याचबरोबर डोकेदुखी सुरू झाल्यानंतर आपण नक्कीच सफरचंद खावे., सफरचंद खाल्ल्याने आपल्याला पाच किंवा दहा मिनिटात डोकेदुखी पासून सुटका होऊ शकते. त्याचबरोबर डोकेदुखी पासून सुटका नाही झाली तरी देखील आपल्याला थोड्या प्रमाणात डोक्याला आराम देखील मिळू शकतो.

डोकेदुखी सुरू झाल्यानंतर डोक्याला मसाज करावी

त्याचबरोबर डोकेदुखी सुरू झाल्यानंतर डोक्याला जर हलक्या हाताने मसाज केली तर, डोके दुखणे कमी होते. परंतु अनेकांना मसाज केल्याने देखील डोकेदुखी दुखणे थांबत नाही. यामुळे केवळ मसाज करून डोकेदुखी बरे होत नाही. यामुळे नवरत्न तेलाने डोक्याची मसाज करावी. ज्या भागात दुखत आहे त्या भागात नवरत्न तेल टाकून जास्त वेळ चोपावे यानंतर अंगावर पांघरून घेऊन एक ते दीड तास झोपावे त्याचबरोबर उठल्या उठल्या लगेच पुन्हा एकदा डोके अलाद हाताने चोपावे यामुळे आपल्याला नक्कीच आराम भेटेल.

त्याचबरोबर हे करूनही आपले डोके बरे झाले नाही तर आपण निलगिरी पासून बनवलेल्या तेला ने डोक्याला मसाज करावी ही मसाज देखील आपण अलगद आणि ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी जास्त वेळ करावी. मात्र आपले जर मसाज केल्याने डोके जास्त दुखू राहिले तर आपण तात्काळ डॉक्टरांकडे जावे. जर आपल्याला तेलाने मसाज केल्याने आराम मिळत असेल तर आपण थोडा वेळ तेलाने डोक्याला मसाज करावी.

निलगिरीच्या तेलामध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म आहेत. त्याचबरोबर निलगिरी मधील असलेल्या या गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अँटी बॅक्टेरियल हे असे गुणधर्म आहे की यामुळे अनेक आजार बरे होतात. डोक्याला किंवा छातीला किंवा घशापाशी लावल्यावर आपल्याला सर्दी किंवा घसेदुखीने असे आजार असले तर ते ठीक होतात. त्याचबरोबर आपण जर या त्याला पासून डोक्यावर मालिश केली तर आपली डोकेदुखीची समस्या देखील बरी होते.

त्याचबरोबर मित्रांनो आपण जर निलगिरीचे तेल आपल्या छातीवर टाकले तर आपल्याला श्वास घेण्यास अधिक सोपे होते. यामुळे आपण महिन्यातून एकदा तरी निलगिरीचे तेल छातीवर टाकावे. यामुळे आपल्याला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळू शकतो.

परंतु मित्रांनो हे लक्षात ठेवा की, निलगिरीचे तेल आपल्या डोक्याला लावल्यानंतर आपण काही वेळ झोप घेणे खूप गरजेचे असते. यामुळे आपल्याला कोणताही प्रकारचा विचार येत नाही. त्याचबरोबर आपण जास्त प्रमाणात तणाव घेत नाहीत यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

डोकेदुखीवर रामबाण उपाय म्हणून गरम दूध आणि दालचिनी घ्या

दुधामध्ये अनेक गुणधर्म असतात. यामुळे डॉक्टर लहानपणी आपल्याला दूध पिण्यासाठी सांगतात. सतत जर आपल्याला डोकेदुखीचा त्रास असेल तर डॉक्टर देखील आपल्याला दूध पिण्यासाठी सांगतात. चला तर मग या दुधामध्ये कोणते गुणधर्म असतात? त्याचबरोबर दूध आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे फायदेशीर आहे? याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

खरोखरच मित्रांनो दूध हे आपल्या शरीरासाठी म्हणजेच आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर दूध हे हायड्रेटिंग प्रथिने युक्त द्रव्य आहे. त्याचबरोबर या दुधामध्ये कॅल्शियम तसेच पोटॅशियम यासारख्या अनेक आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले महत्त्वपूर्ण खनिज आहेत.

त्याचबरोबर दूध हे नैसर्गिकरित्या तयार झालेले व्हिटॅमिन डी ने मजबूत असे द्रव आहे. या दुधामुळे देखील आपल्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. यामुळे आपण जर दररोज एक ग्लास दूध पिलो तर आपल्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास देखील आपल्याला या दुधामुळे कमी होऊ शकतो.

डोकेदुखी हा असा आजार आहे की, हा कधीकधी लवकर बरा होतो, तर कधीकधी हा आजार कितीही उपचार घेतले तरीही बरा होत नाही. यामुळे डोकेदुखी झाल्यानंतर आपण घरगुती उपाय तात्काळ करावेत. त्याचबरोबर घरगुती उपायांनी जर आपल्याला डोकेदुखीला फरक नाही पडला तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर मित्रांनो तुमची जर डोकेदुखी जास्त प्रमाणात झाले असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याचेच बरे म्हणता येईल. कारण डोकेदुखी हा आजार सर्वांनाच असतो परंतु या आजारामुळे आपल्याला इतर समस्या देखील उद्भवू शकतात.

त्याचबरोबर मित्रांनो दररोज आपण जर गावरान तूप खाल्ले तर आपल्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याचबरोबर डोकेदुखी जर आपल्याला सतत होत असेल तर आपण नक्कीच तूप खावे. तुपामुळे आपल्याला मजबूतपणा येतो. त्याचबरोबर आपल्या शरीरात दुखत असलेल्या हाडांना देखील तुपामुळे मजबूतपणा येतो आणि आपले शरीरातील हाडे दुखत नाहीत. तुम्हाला जर तूप खाऊ वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात कशातही तूप मिक्स करून खाऊ शकता.

त्याचबरोबर मित्रांनो हे लक्षात ठेवा की ही माहिती प्राथमिक माहिती आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही कोणताही इतर प्रयोग करू नये. त्याचबरोबर तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास जास्त होत असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावे हे लक्षात ठेवा…Remedy for headache

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *