Thu. Feb 22nd, 2024
Rabi Sorghum CultivationRabi Sorghum Cultivation

Rabi Sorghum Cultivation: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी या पिकाची लागवड कशी करायची? ज्वारी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? ज्वारी पिकासाठी शेतकऱ्याकडे किती प्रमाणात पाणी असावे? ज्वारी लागवड करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? ज्वारी लावण्यासाठी कोणत्या वाणाची निवड करावी? ज्वारी काढण्यासाठी किती दिवस लागतात? ज्वारी पिकासाठी खत व्यवस्थापन? ज्वारीमध्ये घेतल्या जाणाऱ्या आंतरपीक याबद्दलची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

ज्वारी लागवड करण्यासाठी जमीन कशा पद्धतीचे असावी याबद्दल माहिती पाहूया

 शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या शेतजमिनीवर ज्वारी लागवड करणार आहात त्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होत आहे का हे पाहणे खूप गरजेचे असते. कारण ज्वारी लावण्यासाठी पाण्याचा निचरा होणारे जमीन सर्वात चांगली मानली जाते. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर हलक्या जमिनीची ज्वारी लावण्यासाठी निवड केली तर तुम्हाला काही तोटे होऊ शकतात. विशेष म्हणजे हलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त दिवस टिकून राहत नाही. यामुळे तुमच्या ज्वारी पिकाची वाढ होण्यास उशीर होतो. त्याचबरोबर वाट देखील खुंडते. त्याचबरोबर तुमच्याकडे ज्वारीला देण्यासाठी पाणी कमी असेल तर तुमचे उत्पन्न देखील कमी होऊ शकते. यामुळे तुम्ही हलक्या जमिनीत ज्वारी लावण्यापेक्षा मध्यम ते भारी जमीन ज्वारीसाठी निवडावी.

ज्वारी लागवड करण्यासाठी कोणते वाण सर्वात चांगले आहे?

  • ज्वारी लागवड करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या वाणाचा वापर करतात. परंतु कोणत्या जमिनीमध्ये कोणते वाण सर्वात चांगले उत्पन्न देते? हे अनेक शेतकऱ्यांना माहीत नसते. यामुळे तुम्ही या बातमीत कोणते वाण सर्वाधिक उत्पन्न देतात. त्याचबरोबर कोणत्या जमिनीत कोणते वाण लावावे याबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.
  • तुम्ही जर ज्वारी पिकाची लागवड हलक्या जमिनीवर करत असाल तर तुम्ही फुले अनुराधा किंवा फुले माउली या ज्वारी वाणाची निवड करू शकता. कारण हे वाण हलक्या जमिनीवर चांगल्या प्रमाणात उत्पन्न देते.
  • त्याचबरोबर तुम्ही जर मध्यम जमिनीवर ज्वारी पिकाची लागवड करणार असाल तर तुम्ही फुले सुचित्रा, परभणी मोती किंवा फुले चित्रा यापैकी कोणत्याही ज्वारीच्या वाणाची लागवड करू शकता. हे वाण मध्यम जमिनीवर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवून देईल.
  • त्याचबरोबर तुमच्याकडे जर चांगल्या क्वालिटीची म्हणजेच भारी जमीन असेल तर तुम्ही यावर्षीचे सुधारित वाण म्हणजेच फुले वसुधा किंवा फुले यशोदा या ज्वारी वाणाची लागवड करू शकता. यामुळे तुमचे उत्पन्न सर्वाधिक येईल.
  • त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे जर बागायती क्षेत्राखालील काही जमीन असेल तर तुम्ही यासाठी ज्वारीचे वेगळे वाण वापरू शकता. यामुळे तुम्हाला जास्त उत्पन्न आणि कमी क्षेत्रात हे उत्पन्न मिळेल. मित्रांनो बागायती जमिनीसाठी तुम्ही फुले रेवती किंवा सी. एस. व्ही. 18 या ज्वारी वाणाची लागवड करू शकता.Rabi Sorghum Cultivation

विशेष म्हणजे ज्वारी लागवड करण्याचा कालावधी कोणता असतो याबद्दल माहिती पाहू

रब्बी ज्वारी पेरणी ही देशभरात मोठ्या प्रमाणात केली जाते.. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ज्वारी या पिकाची लागवड सर्वात जास्त केली जाते. त्याबरोबर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ज्वारीची लागवड सर्वाधिक केली जाते असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचे उत्तर सरळ आहे. याचे उत्तर असे आहे की महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीची लागवड सर्वाधिक केली जाते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप ज्वारीची लागवड केली जात नाही.

शेतकरी मित्रांनो रब्बी ज्वारी लागवडीची योग्य वेळ कोणती आहे? हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात:-मित्रांनो रब्बी ज्वारीची लागवड ही गोकुळाष्टमी नंतर म्हणजेच एक सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान केली जाते. त्याचबरोबर तुम्ही ज्वारीची लागवड जमिनीच्या ओलीनुसार करू शकता. ओल जर चांगले असेल तर तुम्ही रब्बी ज्वारी 5 सेमी खोल लागवड करू शकता.

त्याचबरोबर मित्रांनो 15 ऑक्टोंबर च्या नंतर रब्बी ज्वारीची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना उशिरा पेरणी केल्यामुळे ओलावा कमी असतो यामुळे ज्वारीला जास्त पाणी द्यावे लागते. आणि पाणी देऊनही ज्वारी कमी प्रमाणात उगते. त्याचबरोबर ज्वारीच्या ताटांची योग्य संख्या देखील राखता येत नाही.

बियाणे पेरताना बियाणांचे प्रमाण आणि बीज प्रक्रिया कशी असावी संपूर्ण माहिती

ज्वारी बियाणे पेरताना किती हेक्टर साठी किती बियाणे लागतात हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो माहितीनुसार, एक हेक्टर क्षेत्रासाठी किमान दहा किलो बियाण्यांची लागवड केली जाते.

त्याचबरोबर मित्रांनो हे लक्षात ठेवा की तुम्ही जर तुमच्या घरच्या बियाणांची लागवड करत असाल तर त्यावर कानी रोग होऊ शकतो. यामुळे तुम्ही कानेरोग प्रतिबंधासाठी किमान 300 मेश गंधक चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात पेरणी करावी. त्याचबरोबर तुम्ही जर पेरणीसाठी उशीर केला तर, तुमच्या ज्वारी पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे तुम्हाला खोडमाशी नियंत्रणात येण्यासाठी थायोमेथोक्‍झाम (70 टक्के) तीन ग्रॅम प्रति किलो अशी बीज प्रक्रिया करावी.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर निव्वळ जनावरांना चारा करण्यासाठी ज्वारीची पेरणी करत असाल तर यासाठी तुम्ही एक एकरी 16 किलो ज्वारी बियाण्यांची पेरणी करू शकता. त्याचबरोबर दोन ओळीतील अंतर किमान 30 से. मी. असावे. यामुळे तुमची ज्वारी दाट येईल आणि तुम्हाला जनावरांसाठी अधिक चारा होईल.

शेतकरी मित्रांनो ज्वारी या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात:-

शेतकरी मित्रांनो तुमच्या रानात जर ओलावा असेल तर तुम्ही पेरणीनंतर काही प्रमाणात ज्वारी उगण्यासाठी पाणी देऊ शकता. त्यानंतर तुम्ही ज्वारी या पिकाला दुसरे पाणी ज्वारी मोठ्या प्रमाणात म्हणजेच जोमदार वाढीसाठी पेरणी झाल्यानंतर किमान 25 ते 30 दिवसांनी पाणी द्यावे. त्याचबरोबर मित्रांनो ज्वारी या पिकासाठी तिसरे पाणी हे 50 ते 55 दिवसांनी म्हणजेच ज्वारी पोटरीत असताना द्यावे. यामुळे तुमचे उत्पन्न जास्त वाढेल.

त्याचबरोबर हे तीन पाणी तुम्ही व्यवस्थित आणि सर्व जवारी पिकांना दिले असेल तर तुमच्या ज्वारी या पिकाची वाढ तसेच शेवटच्या पानापर्यंत चांगल्या प्रमाणात वाढ होते. आणि यामुळे ज्वारीला अन्नद्रव्य कनसात जाण्यास मदत होते.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्वारीला चौथे पाणी हे तब्बल 70 ते 75 दिवसा दरम्यान द्यावे. यावेळी तुमचे ज्वारी पीक हे फुलोऱ्यात आले असेल आणि हे ज्वारी पीक फ्लोरा झाल्यानंतर यावेळी पाणी दिल्यानंतर कणसात दाणे भरण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्याचबरोबर पाचवे पाणी हे तुम्ही 100 दिवसांच्या आत द्यावे. यामुळे ज्वारीचे कोणास मोठ्या प्रमाणात वाढते आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळते. त्याचबरोबर त्या कणसातील दाण्यांचा आकार देखील मोठ्या प्रमाणात वाढतो.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर दंडाने पाणी देत असाल तर तुम्हाला खुरपणीचा खर्च अधिक होऊ शकतो. त्याचबरोबर ज्वारी पिकावरील रोगराई देखील वाढू शकते. मात्र तुम्ही जर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीने ज्वारी या पिकाला पाण्याची सोय केली तर तुम्हाला खुरपणीचा होणारा खर्च कमी होऊ शकतो. त्याचबरोबर फवारणीचा होणारा खर्च कमी होऊ शकतो.

ज्वारीमध्ये कोणते अंतर पीक घेता येते?

शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की, हवामानात बदल झाला आणि थंडीचे प्रमाण वाढले तर ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आणि यामुळे तुमचे ज्वारीचे उत्पन्न घडू शकते. त्याचबरोबर या थंडीच्या वातावरणात तुम्ही करडई या पिकाचे उत्पन्न घेऊ शकता आणि चांगली कमाई करू शकता. करडई हे असे पीक आहे की या पिकामुळे कोणत्याही शेतकऱ्याला तोटा होत नाही. यामुळे तुम्ही ज्वारी अधिक करडई यांचे चार चार प्रमाण ठेवू शकता.

ज्वारीवरील रोग नियंत्रण कसे ठेवावे?

ज्वारी मध्ये अनेक रोग असतात. परंतु काही रोग ज्वारीला जास्त हानी पोहोचवत नाहीत. आणि यामुळे तुमचे उत्पन्न वाढते परंतु ज्वारी मध्ये असे अनेक रोग आहेत की यामुळे तुमच्या उत्पन्न करू शकते.

ज्वारी मधील प्रमुख रोग कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात:- 1. खडखड्या 2. पानावरील करपा 3. कणसातील कामे 4. तांबोरा 5. चिकटा. ज्वारीमधील हे प्रमुख रोग आहेत. हे रोग ज्वारीवर असतील तर तुम्ही या रोगावर विरुद्ध फवारणी नक्की करा.Rabi Sorghum Cultivation

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *