Fri. Jun 14th, 2024
Pm kisan Yojana mahitiPm kisan Yojana mahiti

Pm kisan Yojana mahiti: नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावातील व्यक्तीच्या तोंडातून किंवा टीव्हीमध्ये किंवा स्वतः पी एम किसान योजनेची माहिती पाहिली असेल. पीएम किसान योजना ही मोदी सरकारने सुरू केली आहे. ही योजना मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी देशभरात राबवण्यास सुरुवात केली. त्यानंतर या योजनेअंतर्गत तब्बल लाखो शेतकरी लाभ घेऊ लागले.

त्याचबरोबर आता देखील या योजनेअंतर्गत लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेला आता जवळपास चार ते पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारने या योजनेत सातत्याने नवनवीन बदल केले आहेत. यामधील प्रमुख बदल म्हणजे आधार अपडेट, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे, त्याचबरोबर पीएम किसान ई-केवायसी करणे आणि इतर अशाच बदलांसह ही योजना अधिक सुरक्षित आणि गरजू शेतकऱ्यांना लाभ देत आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल 15 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती या बातमीत पाहुयात.

पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपये दिले जातात?

पी एम किसान ही योजना मोदी सरकारने एक डिसेंबर 2018 रोजी सुरू केली होती. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो गरीब शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मुदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. त्याचबरोबर ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात जमा केले जाते. दर चार महिन्यांच्या अंतराने हे तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात.

पी एम किसान योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?

पी एम किसान योजनेचे काही नियम आणि अटी आहेत. यामधील प्रमुख अट म्हणजे जे शेतकरी आयकर भरत आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. दुसरी अट म्हणजेच जे शेतकरी सरकारी नोकरीवर आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही. आणि तिसरी अट म्हणजे आजी-माजी आमदार खासदार या नागरिकांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जात आहे. त्याचबरोबर डॉक्टर, वकील किंवा अभियंता यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही.

शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकरी वगळण्यासाठी सरकारने ई केवायसी करण्याचा महत्त्वपूर्ण नियम मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्या दरम्यान घेतला होता. आणि या नियमामुळे तब्बल लाखो-अपात्र शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत. त्याचबरोबर या योजनेत लाभ घेण्यासाठी नवनवीन शेतकऱ्यांचा देखील समावेश केला जात आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

त्याचबरोबर या योजनेची अधिकृत माहिती देखील सरकार त्यांच्या पीएम किसान पोर्टलवर सतत देत असते. यामुळे शेतकरी सरकारच्या संपर्कात राहतात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण यावी नाही यामुळे सर्व शेतकरी बांधवांना या योजना आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान देखील उंचावले आहे.

ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी योजना ठरवली आहे. आणि त्याचबरोबर ही योजना देशभरात राबवली जात असून आता या योजनेसारखेच नमो किसान शेतकरी योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यास सुरुवात झाली आहे. नमो महासन्माननिधी योजना ही योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 2023 साली सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांना दिला गेला आहे.

नमो शेतकरी योजनेत कोणते शेतकरी पात्र आहेत?

जे महाराष्ट्रातील शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. तेच शेतकरी नमो किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. त्याचबरोबर या योजनेतून देखील अपात्र शेतकरी वगळले जाणार आहेत. त्याचबरोबर आता माहितीनुसार लवकरच या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी कशी करावी? याबद्दल थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात

पीएम किसान योजनेची नाव नोंदणी करणे खूपच सोपे आहे. यामुळे या योजनेत अनेक शेतकरी अर्ज करून लाभ घेत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर पीएम किसान योजनेचे मुख्य पृष्ठ ओपन होईल. यानंतर तुम्ही शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक करू शकता. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन तीन पर्याय दिसतील. आणि या तीन पर्यायांपैकी तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडावा लागेल.

या तीन पर्यायांपैकी तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडावा लागेल हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर नवीन पेज ओपन होईल. आणि यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी फॉर्म दिसेल. त्यानंतर हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरा यामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून भरा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे खूप आवश्यक आहे.

तुमचे जर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाईल. त्याचबरोबर तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरला तर तुम्हाला काही दिवसानंतर या योजनेची स्थिती दिसेल. आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली तर तुम्ही सरकारने दिलेल्या नवीन अपडेटचे पालन करून या योजनेचा लाभ कायमस्वरूपी घेऊ शकता.Pm kisan Yojana mahiti

परंतु तुमचे उत्पन्न शेतीतून जास्त झाले आणि तुम्ही जर आयकर भरू लागले तर तुम्हाला या योजनेतून वगळले जाईल. त्याचबरोबर तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले आहेत ते संपूर्ण हप्ते सरकार तुमच्याकडून वसूल करेल. त्याचबरोबर तुम्ही जर पैसे देण्यास नाकार दिला तर तुम्हाला सरकारच्या कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेता येणार नाही. यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तसेच योजनेचा लाभ घेताना नियमांचे आणि अटींचे पालन करा.

नियमांचे आणि अटींचे पालन केल्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत नियमित लाभ मिळेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यावर्षी निवडणुका होणार आहेत. या निवडणुका नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान बदलू शकतात?? जर पंतप्रधान बदलले तर ही योजना बंद पडेल का? असा प्रश्न कदाचित शेतकऱ्यांच्या मनात पडला असेल. परंतु, आता ही मोदी सरकारने सुरू केलेली योजना कधीही बंद पडू शकत नाही अशी माहिती आपल्याला सरकारकडून मिळालेली आहे.

परंतु या योजनेत अपात्र शेतकरी जास्त प्रमाणात लाभ घेऊ लागले तर ही योजना नाही लागणे सरकार बंद देखील करू शकते. त्याचबरोबर आता सर्व शेतकरी सोळाव्या हाताच्या प्रतीक्षेत आहेत. सोळावा हप्ता कधी मिळेल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये देण्यात आला होता. या हप्त्यासाठी सरकारकडून करोडो रुपये खर्च झाला असेल.

पी एम किसान योजना कोणी सुरू केली?

पीएम किसान योजना ही मोदी सरकारने सुरू केलेली योजना आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपये दिले जातात?

शेतकऱ्यांना तब्बल वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.

कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाऊ शकते?

जे शेतकरी आयकर भरत आहेत, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याला पेन्शन सुरू झाले आहे ते सर्व शेतकरी या योजनेतून वगळले जाऊ शकतात.

आता शेतकऱ्यांना सोळावा हप्ता कधी मिळू शकेल?

अधिकृत माहितीनुसार शेतकऱ्यांना सोळावा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जाऊ शकतो.

पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का?

पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे पी एम किसान योजना कधीही बंद पडू नये अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा असेल.Pm kisan Yojana mahiti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *