Thu. May 30th, 2024
Mossabi Cultivation InformationMossabi Cultivation Information

Mossabi Cultivation Information: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की सध्या शेतकरी मित्र नवनवीन जुगाड करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे जुगाड यशस्वी होत आहेत. यामुळे शेतकरी जुगाड करण्याच्या भानगडीत जास्त डोकं लावत आहेत. त्याचबरोबर आता शेतकरी नवनवीन पद्धतीने फळबाग लागवड देखील करत आहेत. त्याचबरोबर रेगुलर पीक देखील नवीन पद्धतीने लागवड करण्याची तयारी शेतकरी वर्ग ठेवत आहेत.

 

कमी वेळेत जास्त नफा कमवण्यासाठी शेतकरी जुगाडाचा वापर करत आहेत. त्याचबरोबर शेतीकामात प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून देखील नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. शेतकरी हे आर्थिक दृष्टीने मजबूत हवेत यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक आर्थिक मदत देखील दिले जात आहे. आज आपण या बातमीत मोसंबी या फळबागाची लागवड करून शेतकरी मित्र कशा पद्धतीने लाखो रुपये कमवू शकतात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण मोसंबी या फळबागाची लागवड कशा पद्धतीने केली जाते. मोसंबी फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्याला किती खर्च येतो? शेतकऱ्याने मोसंबी फळबागाची लागवड करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? मोसंबी फळबागाची लागवड करण्यासाठी सुरुवातीला मशागत कशी असावे? मोसंबी फळबाग लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे? मोसंबीची विक्री कोठे आणि कशा पद्धतीने करावी ? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की पहा.

मोसंबी मोसंबी फळाला लोकप्रिय फळ म्हणून देखील सध्याच्या काळात ओळखले जात आहे. त्याचबरोबर मोसंबी फळ लागवड ही भारतामध्ये खूपच जास्त प्रमाणात केली जात आहे. त्याचबरोबर मोसंबी फळ लागवड करून शेतकरी मित्र चांगल्या प्रमाणात नफा देखील कमवत आहेत.

शेतकरी मित्रांनो मोसंबी पिकाची लागवड करण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. मोसंबी लागवड करताना आपल्याला मोसंबीची तसेच जमिनीची आणि पाण्याची नियोजन करणे खूप गरजेचे असते. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी मोसंबीची लागवड ही आपल्या शेत जमिनीत असलेल्या मातीवर अवलंबून असते. शेतकरी मित्रांनो तुमच्या जर जमिनीमध्ये वालोकामय माती असेल तर तुमच्या जमिनीत मोसंबी लागवड केल्यावर तुम्हाला सर्वाधिक उत्पन्न मिळू शकते.

त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या शेतजमीन चिकन माती टाकलेली असेल. किंवा तुम्ही जर मोसंबी लागवड करण्यासाठी खड्डा खांदून चिकन माती टाकली तर या मातीत देखील मोसंबी पिकाचे भन्नाट उत्पन्न होते. यामुळे या दोन मातींना मोसंबी लागवड करण्यासाठी सर्वोत्तम माती म्हणून ओळखले जाते.

मोसंबी मध्ये व्हिटॅमिन सी हे गुणसत्व असते. त्याचबरोबर मोसंबी मध्ये आवश्यक पोषक तत्त्वांचा देखील मोठ्या प्रमाणात स्रोत असतो. यामुळे मोसंबी पिकाच्या फळाला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्याचबरोबर आजारी व्यक्तींना मोसंबी खाण्यासाठी डॉक्टरांकडून सांगण्यात येत असल्यामुळे मोसंबीची लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोसंबी या फळांमध्ये रोग प्रतिकार शक्ती असल्यामुळे हजारे व्यक्तींना ही मोसंबी बर करण्यासाठी खूप मदत करते.

मोसंबी लागवड करण्यासाठी हवामान आणि जमीन कसे असावे याबद्दल सविस्तर माहिती

शेतकरी मित्रांनो, मोसंबी या पिकाची लागवड करण्यासाठी हवामान आणि जमीन खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर मोसंबी पिकाची लागवड विविध मातीमध्ये केली जाऊ शकते. परंतु मोसंबी या पिकाची लागवड जास्त प्रमाणात चिकन माती किंवा व वालुकामय या मातीमध्ये केली जाते. त्याचबरोबर मोसंबी या पिकाची लागवड 20°C असेल किंवा 38°C असेल या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांनी या तापमानात मोसंबी फळबागाची लागवड करण्याचे नियोजन करावे.

परंतु हे लक्षात ठेवा की, तापमान जर जास्त दिवस असेच राहिले तर मोसंबी या फळबागावर दूषित परिणाम देखील होऊ शकतात. यामुळे तुम्हाला हवामानानुसार फवारणी करावी लागेल. किंवा दुसरा इतर उपाय करावा लागेल.

मोसंबी पिकाची लागवड करण्यासाठी कोणत्या जातींची निवड करावी?

सध्याच्या धावपळत्या जगामध्ये मोसंबी पिकाच्या जाती मोठ्या प्रमाणात विकसित केला जात आहेत. परंतु यामधील काही मोसंबीची चव खूपच चांगल्या प्रमाणात आहे. आणि उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे यामधील काही जाती खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत. चला तर मग मोसंबी फळबाग लागवड करण्यासाठी कोणत्या जातीची निवड करावी याबद्दल माहिती पाहूयात.

फिकट हिरवे मोसंबी या जातीची लागवड केल्याने शेतकऱ्याला चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळते. त्याचबरोबर या मोसंबीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन शिल्लक राहत नाही. यामुळे शेतकरी या जातीच्या मोसंबीची लागवड करून देखील चांगला नफा मिळवू शकतात.

सतगुडी या जातीची मोसंबी देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. यामागील कारण म्हणजे ही मोसंबी चवीला अत्यंत गोड आहे. मात्र या मोसंबीचा आकार बारीक आहे. यामुळे या मोसंबी पासून शेतकऱ्याला किंचित उत्पादन कमी निघते. मोसंबी फळाचे लहान आकार असल्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन कमी निघू शकते.Mossabi Cultivation Information

कागदी या जातीच्या मोसंबीला अत्यंत जास्त रसाळ मोसंबी म्हणून ओळखले जाते. म्हणजेच या मोसंबीच्या फळाला जास्त प्रमाणात रस निघतो. ही मोसंबी खाण्यासाठी गुळगुळीत लागते. त्याचबरोबर या मोसंबीचा आकार मान चांगलाच मोठा आहे.

मोसंबी पिकाची लागवड कधी करावी

मोसंबी फळबागाची लागवड कधी करावी म्हणजेच कोणत्या ऋतूमध्ये करावे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. मोसंबी पिकाची लागवड ही पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा पावसाळ्याच्या शेवटी मोसंबीची लागवड केली जाऊ शकते. मात्र, मोसंबी पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्याने अगोदरच मोसंबी लागवड करण्यासाठी योग्य पद्धतीचे खड्डे खोदून ठेवावेत.

त्याचबरोबर मोसंबी फळ भागाची लागवड ही कमीत कमी पाच ते सहा मीटर अंतरावर करावे. म्हणजेच एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंतचे अंतर हे पाच मीटर किंवा सहा मीटर इतके ठेवावे. त्याचबरोबर मोसंबी फळबागाची लागवड करताना मोसंबीचे एक रोपटे 60 सेमी खोल आणि रुंद खड्ड्यात लावावे. त्याचबरोबर मोसंबी लागवड झाल्यानंतर मोसंबी फळबागाला चांगल्या प्रमाणात पाणी द्यावे.

त्याचबरोबर मोसंबी लागवड केल्यानंतर मोसंबीला उन्हाळ्यामध्ये दररोज पाणी द्यावे लागते. यामुळे आपल्याकडे पाणीसाठा असणे खूप गरजेचे असते. मोसंबी लागवड हे आपण ठिबकच्या सहाय्याने करावी. यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागणार नाही. त्याचबरोबर पावसाळा ऋतू असो किंवा हिवाळा होतो असो ठिबकच्या सहाय्याने पाणी मोसंबीला दिल्याने आपल्या शेतात मोकळ्या जागे जास्त तन होणार नाही.

मोसंबी लागवड केल्यानंतर कोण कोणती काळजी घ्यावी? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

मोसंबी या पिकाला बारा महिने पाणी लागते. एका मोसंबीच्या झाडाला दिवसाला कमीत कमी सात ते आठ लिटर पाणी देता यावे इतकी क्षमता तुमच्याकडे असावे. त्याचबरोबर मित्रांनो, मोसंबी पिकाला पाण्याची कमतरता भासली तर मोसंबी करपू शकते. किंवा मोसंबीचे फळे बारीक होऊ शकतात. आणि तुमचे उत्पादन घटू शकते.

मोसंबी पिकाला खतपुरवठा देखील खूप महत्त्वाचा असतो. यामुळे शेतकऱ्याने कृषी सेवा केंद्राच्या सहाय्याने जून ते जुलै या महिन्या दरम्यान मोसंबीला योग्य पद्धतीचे खत द्यावे. हे खत तुम्हाला तुमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल. खत टाकल्यानंतर मोसंबी पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात होते.

त्याचबरोबर मित्रांनो मोसंबी फळबागांमध्ये जास्त प्रमाणात गवत देऊ नये. यामुळे मोसंबी फळबागातील तण काढण्याकडे बारीक लक्ष ठेवावे.

त्याचबरोबर मित्रांनो, मोसंबी फळबागावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे मोसंबी पिकाला वेळोवेळी फवारावे. त्याचबरोबर जास्त प्रमाणात मोसंबीच्या झाडावर कीड किंवा रोग दिसल्यास कृषी तज्ञाचा सल्ला घ्यावा.

त्याचबरोबर मोसंबी पिकाला आलेल्या फळाची कापणी कशा पद्धतीने करावी? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

मोसंबी पिकाचे फळ कापणीसाठी तयार कधी असते? किंवा कधी झाले हे ओळखणे देखील खूप गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या फळावर पिवळसर रंग आला तर मोसंबीचे फळ काढण्यायोग्य झालेले आहे असे समजा. त्याचबरोबर मोसंबी पिकाचे फळ हाताने तोडा त्याचबरोबर मोसंबी पिकाच्या फळाला जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश लागू नये यामुळे मोसंबी थंड ठिकाणी ठेवावी.Mossabi Cultivation Information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *