Mon. Jun 10th, 2024
PM Kusum Yojana 2024PM Kusum Yojana 2024

PM Kusum Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या भारत सरकारने शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी विविध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या निर्णयापैकी पंतप्रधान कुसुम सोलार योजना ही देखील सरकारची महत्त्वकांक्षा योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरून कुसुम सोलार पंप दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीला पाणी देता येते.

मात्र ज्या शेतकऱ्याकडे कुसुम सोलापूर आहे त्यांना ज्या वेळेला लाईट येईल त्या वेळेला पाणी द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्याला कधी रात्रीच्या वेळी पाणी देण्याची देखील आवश्यकता पडते. आणि कधी दिवसा देखील शेतकऱ्यांना पाणी द्यावे लागते. यामध्ये देखील लाईट गेल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा मोटार चालू करण्यासाठी जावे लागते. मात्र कुसुम सोलार पंप हे असे यंत्र आहे की ते उन्हावर चालते.

त्याचबरोबर या यंत्राला चालू किंवा बंद करायला जाण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर ते केवळ दिवसा उन्हाच्या सौर उर्जेवर चालते. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा मोटार सुरू बंदर करण्याची गरज लागत नाही. मात्र रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना मोटारचे स्विच बंद करावे लागते. या कुसुम सोलार योजनेमुळे राज्यातील तसेच देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

त्याचबरोबर आता कुसुम सोलर योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आणि या दुसऱ्या टप्प्यांमध्ये राज्यातील तब्बल 2 लाख शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत सरकारला मोठा आर्थिक भार तिजोरीवर टाकावा लागत असतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तब्बल 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते. आणि हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त हेराफेरी करण्याची देखील आवश्यकता नसते.Kusum Solar Yojana 2024

केवळ ऑनलाइन मोबाईलवरून किंवा गावातील किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ऑनलाईन सेतूवरून ऑनलाईन अर्ज करता येतो. यासाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे भरण्याची किंवा त्या ऑनलाइन अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता नसते. केवळ त्याची मजुरी त्याला द्यावी लागते. यानंतर काही महिन्यानंतर शेतकऱ्याला 95 टक्के अनुदानावर किंवा 90% अनुदानावर सौर कृषी पंप दिले जाते.

सौर कृषी पंपाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा? (SAUR Krushi papmcha Online prosece) 

सौर कृषी पंप या योजनेचा तुम्हाला जर मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर, तो अर्ज तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता याची थोडक्यात माहिती आपण पाहूयात. शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाऊर्जा मेडा या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी भरावी लागतील.

यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल. तुमचा अर्ज दर व्यवस्थित भरला असेल तर तुम्हाला काही दिवसानंतर किंवा त्याच दिवशी अर्ज सक्सेसफुल झालेला मेसेज देखील मिळेल.PM Kusum Yojana 2024

सौर कृषी पंप योजना कधी सुरू झाली ( Pm Kusum solar yojana kadhi suru zali)

सौर कृषी पंप ही योजना महा ऊर्जामार्फत राज्यभरात राबवली जाते. त्याचबरोबर ही योजना कधी सुरू झाली आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल? आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या बातमीत मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो पंतप्रधान कुसुम सोलार योजना ही दिनांक 8 मार्च 2019 रोजी मोदी सरकारकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ही योजना अजून देखील सुरू आहे. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जात असून लवकरात लवकर राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

कुसुम सोलार पंप योजनेचे कोणकोणते फायदे आहेत? (PM Kusum Solar yojana mahiti aani fayde)

 1. कुसुम सोलर पंप सरकारकडून अतिशय कमी किमतीमध्ये देण्यात येणार आहेत.
 2. त्याचबरोबर पंतप्रधान कुसुम सौर ऊर्जा अंतर्गत देशभरातील तब्बल दहा लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलार पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.
 3. त्याचबरोबर कुसुम सौर पंपाद्वारे देखील जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्यात येणार आहे.
 4. विशेष म्हणजे कुसुम सोलर योजनेसाठी आपल्या सरकारकडून तब्बल 60 टक्के ते 65 टक्के अनुदान दिले जाते.
 5. आणि बँकेकडून या योजनेद्वारे शेतकऱ्याला 30 टक्के आर्थिक मदत दिली जाते. यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तब्बल 90 टक्के ते 95 टक्के अनुदान दिले जाते.
 6. त्याचबरोबर पंतप्रधान कुसुम सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्याला केवळ दहा टक्के ते पाच टक्के रक्कम देऊन तब्बल दीड ते दोन लाखाचा सौर कृषी पंप मिळतो
 7. त्याचबरोबर सध्या स्थितीत ज्या राज्यातील जिल्ह्यामध्ये कमी वीजपुरवठा झालेला आहे. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये शेती पिकासाठी पाणी देता येत नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लवकरात लवकर लाभ द्यावा असा शासनाचा प्रयत्न आहे.
 8. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेतकऱ्याने जवळ सौर कृषी पंप जोडली तर शेतकऱ्याला दिवसाचे जास्तीत जास्त बारा तास ते कमीत कमी आठ तास वीज पुरवठा उपलब्ध होईल. आणि शेतकरी आपल्या शेतीला दिवसा बिनधास्त पाणी देऊ शकेल.

पीएम कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कोण कोणती पात्रता असावी लागते? ( Pm Kusum Solar Yojana Patrata Mahiti)

 • शेतकरी मित्रांनो ही योजना केवळ भारतातील शेतकऱ्यांना लागू होते. यामुळे या योजनेचा लाभ फक्त भारतीय शेतकरीच घेऊ शकतात. इतर देशातून आलेला व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान दोन हेक्टर एवढी जमीन असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे यापेक्षा कमी जमीन आहे त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • त्याचबरोबर शेतकऱ्याचे आधार कार्ड
 • शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा
 • जमिनीचा 8अ उतारा
 • जमिनीचा नकाशा
 • शेत जमिनीवर पहिली विहीर किंवा बोर असल्याचा पुरावा देखील शेतकऱ्याला सरकारला दाखवणे आवश्यक असते.
 • शेतकऱ्याच्या जातीचा दाखला
 • शेतकऱ्याचे बँक पासबुक झेरॉक्स
 • त्याचबरोबर अर्जदार शेतकऱ्याचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
 • त्याचबरोबर मित्रांनो, जर दोन शेतकऱ्यांमध्ये एकत्र जमीन असेल तर शेतकऱ्याला सामायिक सातबारा देऊन त्यावर दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भोगवाटेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल.

 

ज्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे. त्या शेतकऱ्याला या योजनेचा किती फायदा होतो. याबद्दल शेतकऱ्याकडून घेतलेली माहिती खालील प्रमाणे…

महाराष्ट्र राज्यातील एका शेतकऱ्याला सौर कृषी पंप अनेक दिवसानंतर मिळाला. यानंतर तो शेतकरी इतका आनंदी झाला की त्याचा आनंद गगणेला मावेना. चला तर मग त्या शेतकऱ्याचे सौर कृषी पंपा बद्दलचे मत काय आहे हे जाणून घेऊया.

शेतकऱ्याचे असे म्हटले आहे की, आम्हाला शेतीचा भरणा करण्यासाठी म्हणजेच शेतीतील पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी लाईट मिळत नव्हती. जी लाईट मिळायची ती लाईट रात्रीच्या वेळी मिळायची. यामुळे शेती पिकाला पाणी देण्यासाठी खूप अडचणी यायच्या त्याचबरोबर कधीकधी रात्रीच्या काळोखात प्राण्यांसोबत देखील संपर्क व्हायचा यामुळे मनामध्ये भेटीचे वातावरण देखील निर्माण व्हायचे आणि शेती पिकाला पाणी न देता एखाद्या वेळेस घरी जावे लागायचे.

मात्र पर्याय नसल्यामुळे आम्हाला रात्री लाईट असताना सिद्धीला पाणी देणे हे भागच होते. मात्र आता मला सौर कृषी पंप मिळालेला आहे. आणि या सौर कृषी पंपामुळे मी दररोज कितीही आणि कधीही आमचे शेत जमीन भिजवू शकतो. आणि मला आनंद होत आहे की आपल्या सरकारने आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के दहा टक्के रक्कम भरून या सौर कृषी पंपाचा लाभ दिला आहे.

विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मला केवळ 22 हजार 500 रुपये भरावे लागले आहेत. यानंतर हा सौर कृषी पंप मला शेतामध्ये थेट फिट करून मिळाला आहे. त्याचबरोबर त्या फिट करणाऱ्या व्यक्तींनी मला या सौर कृषी पंपाबद्दल माहिती देखील दिली. आणि खरंच या सौर कृषी पंपामुळे मला खूपच मदत झाली आहे. मी सरकारचे मनापासून आभार मानत आहे. धन्यवाद…PM Kusum Yojana 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *