Tue. Feb 20th, 2024
Home Remedies After ColdHome Remedies After Cold

Home Remedies After Cold: नमस्कार मित्रांनो, सर्दी हा आजार लहानापासून वयोवृद्ध माणसापर्यंत पसरलेला असतो. हा आजार कधी पाणी बदलल्यामुळे तर कधी हवामान बदलल्यामुळे होतो. हा आजार एखाद्या व्यक्तीला वर्षातील सहा महिने देखील असतो. म्हणजेच त्या व्यक्तीला वर्षाचे सहा महिनेच मोकळा श्वास घेता येतो. मात्र अनेक जणांना हा सर्दीचा आजार खूपच कमी वेळा आणि कमी वेळेसाठी येतो. म्हणजेच एखाद्याला आज सर्दी आली की तो व्यक्ती लगेच घरगुती उपाय करतो. आणि यानंतर त्या व्यक्तीची सर्दी झटपट बरी होते. परंतु काही व्यक्तींची घरगुती उपाय केल्याने देखील सर्दी बरी होत नाही. मात्र त्या व्यक्तीला घरगुती उपाय कोणते आणि कशा पद्धतीने करावे? याबद्दल सविस्तर माहिती नसेल यामुळे त्याची सर्दी लवकर बरी होत नसेल. यामुळे आम्ही आज या बातमीत घरगुती उपायाने सर्दी लवकरात लवकर कशी बरे होते याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

 

मित्रांनो, सर्दी झाल्यानंतर अनेक जण मेडिकल मध्ये जाऊन सर्दी बरी व्हावी यासाठी गोळ्या आणतात. आणि त्या गोळ्या सेवन करतात. आणि गोळ्या सेवन केल्यानंतर एक दोन दिवसात त्या व्यक्तींची सर्दी बरी होते. मात्र काही व्यक्तींची सर्दी गोळ्या खाऊ नये बरी होत नाही. यामुळे ते व्यक्ती सर्दीला कंटाळून जातात. यामुळे त्यांचे घरचे वयोवृद्ध व्यक्ती त्यांना घरगुती उपाय करून सर्दी बऱ्या करण्याचा मार्ग सुचवतात. त्यानंतर तो व्यक्ती घरगुती मार्ग अवलंबून लागतो आणि त्याची सर्दी काही दिवसात बरे देखील होते. मात्र, तो व्यक्ती एकच घरगुती उपाय करून सर्दी बरी करण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे शक्यतो काही व्यक्तींची सर्दी लवकर बरी होत नाही. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त घरगुती उपाय माहित असणे खूप गरजेचे आहे.

 

सर्दी झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदी कोणता घरगुती उपाय करावा? तो उपाय केल्यानंतर सर्दी जर बरी नाही झाली तर कोणता उपाय करावा? अशी टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे…

 

1. सर्दी झाल्यानंतर सर्वात सुरुवातीला गरम पाणी प्यावे.

सर्दी झाल्यानंतर आपण गरम उकळलेले पाणी गार करून पिऊ शकतो. उकळलेल्या पाण्यामुळे सर्दीला आराम मिळतो. आणि आणि तुमचे जर नाक सर्दीने कोंडलेले असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ओवा टाकून वाफ घेतल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्याचबरोबर या वाफेमुळे आपली सर्दी देखील लवकरात लवकर बरी होते. आणि हवं असेल तर तुम्ही सर्दी साठी मध आणि हळदीचा पेस्ट करून ठेवू शकता. यामुळे सर्दी बरी होते आणि त्याचबरोबर मध आणि हळद या मुळे अनेक आजारही बरे होतात.Home Remedies After Cold

 

2. सर्दी झाल्यानंतर हळद आणि दूध यांचे मिश्रण देखील घरगुती उपायांमध्ये खूपच फायदेशीर मानले जात आहे

हळद आणि दूध पिल्याने सर्दी वर कोणता परिणाम होतो. ते आपण पुढील प्रमाणे पाहुयात. हळदीमध्ये असलेले अँटिऑक्साइड आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात म्हणून हळद आणि दूध पिल्यास सर्दी बरी होते. हळद आणि दूध हा सर्दी साठी रामबाण उपाय आहे. एक ग्लास गरम दुधामध्ये एक चमचा हळद मिक्स करून घ्यायचे हे दूध रात्री झोपण्याआधी पिणे खूपच आरोग्यदायी ठरते. यामुळे आपल्या घशामध्ये होत असलेली तडतड तसेच नाक साफ होण्यासाठी मदत होते. आणि आपली सर्दी या उपायाने लवकर बरी होते.

 

3.सर्दी झाल्यास झेंडू बाम हा उपाय देखील खूपच फायदेशीर आहे

अनेकांना सर्दी झाल्यानंतर काय करावे हे कळत नाही अनेकजण सर्दी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करत नाही म्हणून काहीजण घरगुती उपाय शोधतात तर त्यांच्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे.
सर्वांच्या घरी असणारा हा झेंडू बॉम्ब तुम्ही सर्दी वर उपाय म्हणून वापरू शकतात. आपण सहसा झेंडू बाम डोकं दुखल्यानंतर बरे होण्यासाठी वापरतो त्याचबरोबर अंग दुखल्यावर बरे होण्यासाठी वापरतो. परंतु तुम्ही कधी सर्दी साठी हा झेंडू बॉम्ब वापरला आहे का? आपण पाहूया हा झेंडू बॉम्ब कशाप्रकारे वापरता येईल. झंडू बाम डोक्याला लावू शकतो त्याच बरोबर छातीला लावू शकतो आणि त्याचबरोबर उकळत्या पाण्यात थोडासा झेंडू बाम टाकून त्याची वाफ घेऊ शकतो. या झेंडू बामच्या वाफेमुळे बंद नाक झालेले मोकळे होते आणि श्वास घेण्यास सोपे जाते. हा घरगुती उपाय खूपच उपयुक्त आहे.

 

तुमचे जर नाक सर्दीमुळे खूपच जाम झाले असेल तर तुम्ही सर्वात सुरुवातीला गॅसवर किंवा चुलीवर पाणी खळखळ उकळू द्या. त्यानंतर पाण्यामध्ये थोडासा झेंडू बाम टाका आणि झंडू बाम टाकल्यानंतर आपल्याला वाफ बाहेर निघून जाऊ नये यासाठी अंगावर आणि पातेल्यावर पांघरून टाकून वाफ घ्या. वाफ तुम्हाला जितके सहन होईल तितकी घ्या यामुळे तुमचा घसा तसेच नाक मोकळे होण्यास खूप मदत होते. या पद्धतीने वाफ घेतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर खूप घाम येतो. तो घाम वाफ घेऊन झाल्यानंतर पुसा आणि लगेच पांघरून घेऊन दडपून झोपा. यामुळे तुमच्या अंगात उष्णता कायम राहते. आणि तुम्हाला सर्दी पासून मुक्तता होण्यास मदत होते.

 

4. सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे देखील खूपच उपयुक्त आहे

आल्याचा चहा बनवण्याची प्रोसेस पुढील प्रमाणे पाहुयात-आल्याचा चहा बनवण्यासाठी सुरुवातीला पातील्यात थोडे पाणी घ्या त्यानंतर त्या पातील्यात आलं टाका. आलं टाकल्यानंतर ते पाणी उकळू द्या त्यानंतर त्या पाण्यात दूध तसेच साखर आणि चहा पत्ती टाका. पुन्हा थोडा वेळ आल्याचा चहा उकळू द्या. चहा उकळल्यानंतर गरम चहा लगेच प्या. यामुळे तुमच्या सर्दी वर खूपच परिणाम होईल.

 

5. मध आणि आल्याचा रस हा देखील सर्दी वर खूपच उपयुक्त पर्याय आहे

सर्दी झाल्यानंतर अनेक व्यक्तींना काय करावे हे सुधरत नाही यामुळे ते व्यक्ती जास्त करून झेंडू बाम किंवा इतर उपाय वापरतात परंतु अनेकांना मध आणि आल्याचा रस पिण्याचे फायदे माहित नाहीत. सर्दी तसेच खोकल्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी मध आणि आल्याचा रस यांचे मिश्रण खूपच फायदेशीर आहे. हे मिश्रण पिल्याने आपल्याला लवकरात लवकर सर्दी पासून सुटका मिळू शकते.

 

आले आणि मध यांचे मिश्रण कसे तयार करायचे याबद्दल थोडीशी माहिती पुढील प्रमाणे पाहूयात- आले आणि मधाचा रस एकत्र करा त्यानंतर तो एकत्र केलेला रस चुलीवर किंवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आणि हा रस हलकासा गरम करा यानंतर हा रस हलकासा गरम असल्यावर लगेच प्या. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला जर जास्त प्रमाणात सर्दी झाली असेल तर हा रस उपयुक्त ठरणार नाही.

 

6. आपल्या अंगणातील तुळस देखील सर्दी साठी खूपच फायदेशीर आहे

मित्रांनो, ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सर्वच घरापुढे किंवा गच्चीवर किंवा बाल्कनीत जिथे जागा आहे तिथे तुळशीचे छोटेसे रोपटे लावलेले असते. या तुळशीची पूजा आपल्या घरातील महिला किंवा मुली करतात. या तुळशीचे फायदे देखील खूप आहेत. या तुळशीमुळे आपल्या घरातील नकारात्मक विचार तसेच इत्यादी गोष्टींचा घरावर परिणाम होत नाही. परंतु हे तुळशीचे पाने सेवन केल्याने आपला खोकला किंवा सर्दी बरी होण्यास देखील मदत होते.

मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला सर्दी होते. आणि ही सर्दी दोन-तीन दिवस कायम आपल्याला राहते त्यावेळेस आपल्या घशात दुखण्यास सुरुवात होते. हे दुखणे वाढू नये म्हणून आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो. त्यानंतर डॉक्टर देखील अनेक वेळा तुळशीचे पाने खा किंवा इतर घरगुती उपाय करा असे उपाय सुचवतात. मात्र हे उपाय अनेकांना माहीत नसतात यामुळे तुम्हाला जर सर्दी झाली असेल आणि तुमचा घसा दुखू लागला असेल तर तुम्ही तुळशीचे पाने चघळून खाऊ शकता किंवा तुळशीचे पाने आणि आल्याच्या रसाचा चहा नक्की प्या. त्याचबरोबर मित्रांनो हे लक्षात ठेवा की, कोणताही घरगुती उपाय जास्त दिवस केल्याने आपल्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो. यामुळे घरगुती उपाय हा अंतिम उपाय नसून आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते. यामुळे तुम्हाला जर जास्त प्रमाणात सर्दी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

 

महत्त्वाची सूचना:-ही बातमी फक्त सामान्य माहितीच्या आधारावर आहे. या बातमीत आम्ही कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. यामुळे तुम्ही कोणताही घरगुती उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्याचबरोबर यामधील उपाय जर तुम्हाला आवडला नसेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.Home Remedies After Cold

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *