Thu. Feb 22nd, 2024
Goat farming informationGoat farming information

Goat farming information: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत शेळीपालन या व्यवसायाबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामुळे ही बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. आणि ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर या अनुदानामुळे शेतकरी हजारो शेतकरी शेळी पालन करताना देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेतl.

 

शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूपच परवडणारा व्यवसाय आहे. त्याचबरोबर या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर आता शासनाच्या मदतीने शेतकरी केवळ 30 टक्के गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. सरकारकडून शेळी पालन करण्यासाठी शेडचे अनुदान देखील सुरू असते.

त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना पशुपालन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी शिंदे सरकारची योजना सध्या सुरू आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून देखील शेळी पालन करणाऱ्या तसेच पशुपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना सुरू होत आहेत. आणि त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत.

आज आपण या बातमीत शेळी पालन कशा पद्धतीने करावे? शेळीच्या कोणत्या जातीचे निवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे? शेळीसाठी कोणता चारा सर्वात चांगला असतो? त्याचबरोबर शेळी पालन करून शेतकरी जास्तीत जास्त नफा कशा पद्धतीने मिळवू शकतो? शेळी पालन साठी सरकारकडून कशा पद्धतीने अनुदान मिळते? शेळी पालन योजनेचा सरकार कडून लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करावा? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.Goat farming information

शेळीपालन योजना सरकारकडून कशी राबवली जाते संपूर्ण माहिती?

राज्यभरात पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर शेळी पालन या योजनेचा लाभ घेऊन बेरोजगार करून देखील स्वयंरोजगार होऊ शकतात. त्याचबरोबर तरुणांना किंवा वयोवृद्ध नागरिकांना देखील हा धंदा करता येतो. यामुळे शेळीपालन ही योजना सरकारने राबवण्याचे ठरवले आहे.

राज्यातील गोरगरीब नागरिकांना आर्थिक लाभ मिळावा. त्याचबरोबर गोरगरीब नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून शेळ्या, मेंढ्या, बाय, बैल अशा इत्यादी पशुपालनासाठी पैशांची मदत केली जाते.

त्याचबरोबर, आपल्या राज्यामध्ये पशुपालन म्हणजेच दूध व्यवसाय तसेच मास व्यवसाय याचे उत्पन्न वाढवावे. यासाठी देखील सरकार सकारात्मक विचार करत आहे. आणि गोरगरीब शेतकऱ्यांना शेळीपालन साठी अनुदान देत आहे.

शेळीपालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून देखील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे बघतात. हा व्यवसाय अनेक शेतकरी शेती बघत बघत करू शकतात. त्याचबरोबर शेळ्यांना जास्त प्रमाणात खाद्याची आवश्यकता नसते यामुळे शेळीपालन कोणताही शेतकरी सहज करू शकतो. त्याचबरोबर शेळ्यांना पाणी पिण्यासाठी जास्त पाण्याची देखील आवश्यकता नसते. आणि या शेळ्या आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात बसू शकतात. यामुळे देखील शेतकरी शेळीपालन हा व्यवसाय जास्तीत जास्त करतात.

शेळीपालन करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा? यासाठी कोणत्या जातींच्या शेळ्या पाळाव्यात

शेळी पालन करण्यासाठी भारतीय जाती कोणकोणते आहेत हे आपण सुरुवातीला पाहूयात. शेळ्यांच्या भारतीय जातीं भारतामध्ये तब्बल वीस आहेत. यामधील काही जाती दुध देण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहेत. तर काही जाती ह्या मासासाठी खूपच चांगले आहेत. त्याचबरोबर काही जाती कमी वेळेत लवकर वाढतात आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर उत्पन्न मिळते.

दूध उत्पादनास चांगल्या असणाऱ्या शेळ्यांच्या जाती

  1. बीटल
  2. जमानापरी
  3. बारबेरी
  4. मारवाडी
  5. सुरती

वरच दिलेल्या जातीच्या शेळ्या पाडून शेतकरी चांगल्या प्रमाणात दूध उत्पादन घेऊ शकतात. त्याचबरोबर या शेळ्यांचे मांस देखील विकून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. परंतु या शेळ्या दूध उत्पादनास सर्वोत्कृष्ट आहेत असे म्हटले जाते.

मासांसाठी वापरल्या जाणाऱ्या शेळ्यांच्या जाती कोणकोणत्या आहेत

  • उस्मानाबादी
  • अजमेरी
  • बीटल
  • सुरती
  • संगमनेरी

वर दिलेल्या जातींच्या शेळ्या पाळून शेतकरी चांगल्या प्रमाणात मासाचे उत्पन्न घेऊ शकतात. या शेळ्या कमी वेळेत जास्त वजनाच्या भारतात. यामुळे या जातीच्या शेळ्या मासांसाठी खूपच प्रसिद्ध आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो, विदेशी शाळा देखील भारतामध्ये आता पाळल्या जातात. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना या शाळा घेणे शक्य नसते. यामुळे अनेक शेतकरी आपल्या भारतीय शेळ्या पाळून चांगला नफा कमवतात.

शेळी पालन करण्याचे प्रमुख्याने दोन प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार म्हणजेच बंदिस्त शेळीपालन. आणि दुसरा प्रकार म्हणजे अर्धबंदिस्त शेळीपालन. या दोन्ही शेळीपालना बद्दल च्या संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. बंदिस्त शेळीपालन याबद्दल आपण सुरुवातीला माहिती पाहुयात…

बंदिस्त शेळीपालन केल्याचे अनेक फायदे असतात. त्याचबरोबर बंदिस्त शेळी पालन केल्याने आपल्याला जास्त कष्ट देखील घ्यावी लागते. बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी आपल्याला एक चांगला आणि मजबूत गोठा लागतो. त्याचबरोबर माहितीनुसार बंदिस्त शेळ्या ठेवल्याने शेळ्यांची झपाट्याने वाढ होते. त्याचबरोबर बंदिस्त शेळ्या ठेवण्यासाठी आपल्याकडे चांगल्या प्रकारचा गोठा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हा गोठा मोठा असावा. आणि या गोठ्यामध्ये मुरूम टाकलेला असावा. मुरूम टाकलेला आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो. यामुळे शेळ्यांनी टाकलेली विस्टा तसेच इतर गोष्टींचा निचरा लवकरात लवकर होतो.

त्याचबरोबर या शाळांना सर्व काही म्हणजेच चारा आणि पाण्याची सोय एकाच ठिकाणी करावे. त्याचबरोबर शेळ्यांच्या आजारानुसार तसेच त्यांच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या कप्पे असावेत. म्हणजेच ज्या शेळ्या गाभण आहेत त्यांच्यासाठी वेगळा कपा, तसेच ज्या शेळ्या आजारी आहेत त्यांच्यासाठी वेगळा कापा आणि जे लहान लहान पिल्ले आहेत त्यांच्यासाठी देखील वेगळा कप्पा असणे आवश्यक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे बोकड असते त्यांच्यासाठी देखील वेगळा कापा असावा. जेणेकरून कोणत्याही शिळेला तसेच पिल्लांना तसेच आजारी असलेल्या शेळ्यांना कसलाही त्रास होत नाही. आणि सर्व शेळ्यांना व्यवस्थित अन्न चारा मिळतो.

त्याचबरोबर शेळ्यांना आपण जो चारा देत आहोत तो चारा तुकड्यांमध्ये द्यावा. जेणेकरून चाऱ्याची जास्त प्रमाणात नासाडी होणार नाही. आणि शेळ्यांना तसेच पिल्लांना वेळेवर लसीकरण करून घ्यावे. ज्यामुळे आपल्या शेळ्यांना किंवा पिल्लांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी आपण शेळ्या बांधतो त्या ठिकाणी शेळ्यांना ऊन पाऊस किंवा जास्त प्रमाणात वारा लागू नये.

अर्धबंदिस्त शेळी पालन म्हणजे काय? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…

अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे रात्रीच्या वेळी शेळ्यांना एखाद्या गोठ्यात ठेवणे. आणि अर्ध बंदिस्त शेळी पालन केल्याने आपल्याला साऱ्याचा खर्च जास्त प्रमाणात करायची गरज नाही. त्याचबरोबर जास्त प्रमाणात कप्पे करण्याची देखील आवश्यकता नसते. त्याचबरोबर शेळ्यांची व्यवस्थापन, गोठा बांधणे आणि देखभाल खर्च यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात बचत होते.

शेळ्या जर फिरून फिरून चारा खात असतील तर शेळ्यांचा चांगल्या प्रमाणात व्यायाम होतो. आणि शेळ्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. हा देखील अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये महत्त्वाचा फायदा मानला जातो. अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये कोणकोणते तोटे होतात हे देखील आपण पुढील प्रमाणे पाहूयात.

शेतकरी मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी शेळ्या घेऊन जातो त्या ठिकाणी अनेक जण दुसऱ्या शेळ्या घेऊन येतात. आणि त्यांच्या शेळ्यांना जर आजार असेल तर त्या शेळ्यांचा आजार आपल्या शेळ्यांना होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शेळ्यांनी चारा व्यवस्थित खाल्ला का? शेळ्यांचे पोट भरले असेल का? याचे आपल्याला मोजबाब करता येत नाही.

शेळीपालन योजनेतून सरकार अनुदान कसे देते?

शेळी पालन करण्यासाठी किंवा पशुपालन करण्यासाठी सरकार सर्व शेतकरी बांधवांना अनुदान देत आहे. शेळी पालन साठी गोठा बांधणे किंवा शेळ्या खरेदी करण्यासाठी देखील सरकार अनुदान देत आहे. परंतु यासाठी शेतकऱ्याला पशुसंवर्धन विभागात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्या ठिकाणी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची शेतकऱ्याला झेरॉक्स प्रत द्यावी लागते. आणि अर्ज जमा केल्यानंतर तो शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे की नाही. हे पाहून सरकार शेतकऱ्याला अनुदान देत असते.Goat farming information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *