Mon. Jun 10th, 2024
Farm NewsFarm News

Farm News: शेततळे कसे बनवतात? शेततळे बनवण्यासाठी किती खर्च येतो?? शेततळ्याचे फायदे? शेततळे किती मोठे असावे? शेततळ्यामुळे आपल्याला कोणते दुष्परिणाम होतात? शेततळ्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची आपल्याला गरज असते? शेततळे उन्हाळ्यामध्ये किती टक्के भरावे? शेततळे लेकीच झाल्यावर काय करावे? शेततळ्यामध्ये आपल्याला कोणता व्यवसाय करता येतो? किती शेती असल्यावर शेततळे परवडते? शेततळे असल्यावर आपण जमिनीत कोणते पीक घ्यावे? अशा पद्धतीचे संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

 

शेततळे ही सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असलेली गोष्ट बनली आहे. शेततळ्यामुळे अनेक नागरिकांना पाणीसाठा करता येत आहे. या पाणी साठ्यामुळे तसेच शेततळे असल्यावर आपल्याला इतर व्यवसाय ही करता येत आहेत. त्याचबरोबर शेतकरी शेततळ्याचा वापर करून चांगल्या प्रमाणात शेतातून उत्पादन घेत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो मत्स्य व्यवसाय करून देखील अनेक शेतकरी उत्पादन घेत आहेत. परंतु या क्षेत्रासाठी किती खर्च येतो? शेततळ्यासारखे डुबलीकेट शेततळे जर आपल्याला करून दिले तर आपण तक्रार कुठे करावी? अशी माहिती अनेक जणांना माहीत नसते. यामुळे तुम्ही ही माहिती संपूर्ण नक्की वाचा.

शेततळे ही नैसर्गिक रित्या देखील बनवता येते. म्हणजेच शेततळ्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे 1)  नैसर्गिक घळ पाडून शेततळे दुसरा प्रकार म्हणजे 2) सफर जमिनीवर टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने बनवलेले शेततळे. चला तर मग मित्रांनो आपण सुरुवातीला शेततळ्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया.

शेततळे याबद्दल थोडीशी माहिती घेऊया

शेततळे हे आपल्याला अनेक कारणासाठी वापरता येते. परंतु तुम्ही जर फक्त एका कारणासाठी शेततळ्याचा वापर करणार असाल तर कदाचित तुम्हाला शेततळे बनवणे परवडणार नाही. परंतु तुम्ही जर शेततळ्यापासून अनेक पद्धतीने उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच शेततळ्यातून चांगले उत्पादन घेऊ शकता आणि श्रीमंत होऊ शकता.

शेतकऱ्यांना शेततळे हे बनवण्यासाठी आपण त्याचा आकारमान त्याचबरोबर पाऊस आणि त्याची तीव्रता पाहणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे? आणि किती क्षेत्रावर शेततळ्याचा वापर करायचा आहे म्हणजेच तुम्हाला किती क्षेत्र या शेततळ्याच्या मदतीने भिजवायचे आहे. ही माहीत असणे खूप गरजेचे असते.

त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला शेततळ्याबद्दल अधिक माहिती शेततळे बनवणारे व्यक्ती तसेच शेततळे अभ्यासक शेतकरी मित्र देऊ शकतात. यामुळे आपण हा विषय बाजूला ठेवून शेततळे आपल्याला कोणत्या पद्धतीचे केल्यावर परवडेल याबद्दल माहिती पाहूया.. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नैसर्गिक घळ पाडून शेततळे निर्माण करण्याचा विचार करत असाल तर हे शेततळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये साथ देणार नाहीत.

म्हणजेच हे शेततळे उन्हाळ्यामध्ये पाणी साठवून ठेवू शकत नाहीत. परंतु पावसाळ्यामध्ये तसेच पावसाळा संपल्यानंतर काही दिवस जमिनीमध्ये पाण्याचा प्रभाव जास्त प्रमाणात हे शेततळे ठेवू शकते. मात्र तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता असेल तर, तुम्ही सपाट जमिनीतील पॅकिंग शेततळे बनवणे खूप फायद्याचे असते. त्याचबरोबर तुम्हाला मत्स्य व्यवसाय देखील करता येतो. आणि या शेततळ्याच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागणारे पीक घेऊ शकता.Farm News

आणि तुम्हाला ज्या वेळेला पाणी लागेल त्या वेळेला तुम्ही या क्षेत्रातून पाणी काढून घेऊ शकता. आणि पुन्हा विहीर किंवा बोर च्या मदतीने या क्षेत्रात पाणी भरणा करू शकता. हे शेततळे जास्त मोठ्या आकाराचे असते आणि विहीर किंवा बोर हे खूपच कमी आकाराचे असते. यामुळे बोर किंवा विहीर मध्ये पाणीसाठा जास्त प्रमाणात राहत नाही. आणि तुम्ही जर शेततळे घेतले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होतो. आणि यामुळे तुम्ही गरजेप्रमाणे पाणी वापरू शकता.

डिजिटल पद्धतीने शेततळे आणि मत्स्य व्यवसाय कशा पद्धतीने करावा याबद्दल थोडीशी माहिती घेऊया

सध्या अनेक शेतकरी डिजिटल पद्धतीने शेततळे बांधून मत्स्य व्यवसायव्यवसाय करत आहेत. आणि चांगला नफा कमवत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांना या व्यवसायातून देखील तोटा होण्याचे तुम्ही नक्की ऐकले असेल. परंतु, जो शेतकरी या व्यवसायात टिकून राहतो त्या शेतकऱ्याला कदाचित तोटा कधीही होत नाही.

त्याचबरोबर मित्रांनो सध्या सरकारकडून देखील पाणीसाठा वाढवावा आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा. यासाठी सरकारकडून मागेल त्याला शेततळे अशी महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र राज्यात राबवली जात आहे. सध्या देशभरात पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. आणि या पावसाच्या कमी प्रमाणात होण्यामुळे शेतकऱ्यांना पाणी अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शासनाने ही योजना गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाहीत. त्याचबरोबर पावसाचा खंड पडल्यावर पिकाचे नुकसान देखील होत नाही. त्याचबरोबर शेततळे मिळालेल्या शेतकऱ्यांना नक्कीच उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

शेततळ्यांमध्ये अनेक शेतकरी पावसाचे पाणी देखील गोळा करून ठेवू शकतात. आणि या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज पडेल त्यावेळेस वापरता येऊ शकते. त्याचबरोबर खरीप पिकातील पिकांना पाण्याचा व्यवस्थित स्त्रोत मिळावा यासाठी देखील हे शेततळे खूप महत्त्वाचे आहे.

चला तर मग आता शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात? Farm Fish Business 2024 Information

शेतकरी मित्रांनो मत्स्य व्यवसाय करण्यासाठी आपण निवडलेल्या शेततळ्यासाठी प्लास्टिक कागद खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर प्लास्टिक कागद कोणता निवडला आहे. यावर आपण मत्स्य बीज निवडू शकतो. मत्स्य बीज निवडताना हे लक्षात ठेवा की, निर्माण होणारे मासे तळ्यातील शेवाळ खाणारे असावेत.

त्याचबरोबर या मासेना बाजारामध्ये चांगला भाव असावा. आणि हे या मासेना बाजारामध्ये चांगल्या प्रमाणात मागणी असावी. त्याचबरोबर मासे जलद गतीने मोठे व्हावेत या बिजांची निवड करण्याने तुम्हाला नक्कीच जास्त फायदा होईल. आणि तुम्ही कमी वेळात जास्त नफा कमवू शकता.

शेततळे बनवण्यासाठी कशा पद्धतीची जागा असावी?

शेतकरी बनवण्यासाठी तुमच्यापाशी कमीत कमी 5 ते 10 गुंठे जमीन असावी. एवढ्या क्षेत्रात आपण चांगल्या प्रमाणात शेततळ्याची निर्मिती करू शकतो. शेततळे बनवण्याची योग्य पद्धत ही 20 गुणिले 20 गुणिले 3 मि. अशी असते. यापेक्षा कमी क्षेत्रात म्हणजेच आकारात शेततळ्याची निर्मिती करू नये.

त्याचबरोबर मित्रांनो शेततळ्या निर्माण करण्याचे ठिकाण हे कमीत कमी तीन टक्के पर्यंत जमिनीचा उतार असलेले क्षेत्र असावे. आणि त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रमाणात शेततळे निर्माण करू शकता. त्याचबरोबर तुमच्या शेततळ्यात कमीत कमी 1000 घनमीटर पाणी साठवून ठेवता येणे अशी शेततळे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे जर तीन हेक्टर एवढी जमीन असेल तर तुम्ही शेततळे निर्माण करू शकता. म्हणजेच तुम्हाला एवढ्या साठी शेतात निर्माण करणे परवडेल. त्याचबरोबर हे शेततळे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहील.

शेततळे योजना कधी सुरू झाली? आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो?

मागेल त्याला शेततळे ही योजना देशभरात 9 फेब्रुवारी 2016 रोजी घेण्यात आलेल्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. त्याचबरोबर या योजनेमुळे जलसंधारण महामंडळाच्या निधीमध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक तिजोरी भरण्यात आले आहे आणि या तरतुदीमुळे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दिला जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे शेतकऱ्यांना लागतात याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात.

  1.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र रहिवासी असावा. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याकडे रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे
  2. शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा असणे आवश्यक आहे
  3. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या जातीची पडताळणी म्हणजेच जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  4. शेतकऱ्याचे आधार कार्ड
  5. त्याचबरोबर शेतकऱ्याकडे आठ अ प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे
  6. त्याचबरोबर स्वतः लागेल त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरी किंवा अशिक्षित असल्यास अंगठा लावून व्यवस्थित फॉर्म भरणे गरजेचे आहे….Farm News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *