Mon. May 27th, 2024
Cultivation information of sitafalCultivation information of sitafal

Cultivation information of sitafal: नमस्कार मित्रांनो, शेती हा खूपच न परवडणारा धंदा म्हणून सगळीकडे ओळखला जात आहे. परंतु जो शेतकरी चांगल्या आणि दर्जेदार पद्धतीने शेती करतो त्यासाठी हा धंदा खूपच परवडणारा मानला जातो. मात्र सर्व शेतकऱ्यांना चांगली शेती करणे जमत नाही. यामुळे अनेक वेळा शेतकरी तोट्यात जातात. परंतु शेती ही सर्वकाही निसर्गावर अवलंबून असते. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाची साथ असणे देखील खूप गरजेचे असते.

अलीकडच्या काळात शेतीमध्ये फळ लागवड, तसेच वृक्ष लागवड या व्यवसायातून उत्पन्न वाढवण्याचे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. परंतु, वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याचा साठा असणे खूप गरजेचे असते. कारण बारा महिने पाणी शेतकऱ्याकडे नसेल तर उन्हाळ्यामध्ये वृक्ष तसेच फळबाग करपून जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. चला तर मग आज आपण सिताफळ लागवड कशा पद्धतीने करायची? त्याचबरोबर सिताफळाची योग्य काढणी कधी असावी? सीताफळ लागवड करण्यासाठी माती कशी असावी? सिताफळ लागवड करण्यासाठी पाण्याचा साठा किती असावा? याबद्दल संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघुयात.

शेतकऱ्यांवर सीताफळ लागवड करून अनेक शेतकरी सध्या लाखो रुपये कमवत आहेत. मात्र सीताफळ लागवड कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना ही शेती करायची असते परंतु त्यांच्याकडे अपुरी माहिती असल्यामुळे त्यांना ही शेती करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला या बातमीत सहल लागवड याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

यामुळे तुम्हाला सिताफळ लागवड करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये सिताफळ लागवड केली तर तुम्हाला अंदाजे 120 ते 130 क्विंटल एकरी उत्पन्न देखील मिळू शकते. परंतु यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ या पिकातून नक्की मिळू शकते.Cultivation information of sitafal

शेतकरी मित्रांनो तुमची जमीन जर कोरडवाहू पद्धतीची जमीन असेल तर तुम्ही सिताफळाची लागवड करावी की नाही? असा प्रश्न कदाचित सर्व शेतकऱ्यांना पडतो. मात्र याचे उत्तर देखील खूप सोपे आहे तुम्ही कोरडवाहू हलकीच उथळ जमिनीमध्ये देखील सिताफळ या फळबागाची लागवड करू शकता आणि चांगले उत्पन्न घेऊ शकता.

चांगले उत्पन्न घेण्यासाठी आपल्याकडे चांगली जमीन असावी असे काही नसते. आपण खराब दर्जाच्या मातीमध्ये देखील चांगले उत्पन्न घेऊ शकतो. परंतु आपल्याला यासाठी व्यवस्थापन चांगले करणे खूप गरजेचे असते. आपण जर चांगले व्यवस्थापन केले तर आपण कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये बागायती पिकाची लागवड करून चांगले उत्पन्न घेऊ शकतो.

सिताफळ पिकाला अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पीक म्हणून ओळखतात. अनेक भागात तर सिताफळ हे असेच रस्त्याच्या कडेने किंवा नदीच्या कडेने किंवा शेतीच्या बांधावर मोठ्या प्रमाणात उगलेले असतात. आणि यापासून होणारे उत्पन्न कोणीही घेऊन जाते. आणि कोणत्याही शेतकऱ्याला याचा काही परिणाम होत नाही. कारण त्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या अवतीभवती जास्त प्रमाणात सीताफळे असल्यामुळे त्याला कोणताही तोटा होत नाही. तो शेतीतून उत्पन्न घेतोच परंतु सीताफळ विकून देखील अनेक वेळा उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो.

मित्रांनो, आपण जर फक्त सिताफळ याच पिकाची लागवड करून उत्पन्न घेण्याचा विचार केला तर आपल्याला आजूबाजूच्या नागरिकांकडे, वाहून जाणाऱ्या गाड्यांकडे, त्याचबरोबर वन्य प्राण्यांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण आपल्याला आपल्या शेतीतून फक्त सीताफळाचे उत्पन्न असणार आहे आणि हेच उत्पन्न एखाद्या व्यक्तीने घेऊन गेले तर आपल्याला काहीच बोलणार नाही. यामुळे आपण आपल्या शेतीकडे लक्ष ठेवावे.

सीताफळ लागोळ करण्यासाठी शेतकऱ्याकडे किती पाणीसाठा असावा?

सिताफळ लागवड करण्याचा एखाद्या शेतकऱ्याने विचार केला तर सर्वात पहिला प्रश्न त्या शेतकऱ्यांना पडतो तो म्हणजे पाण्याचा…? पाणी जर शेतकऱ्याकडे नसेल तर शेतकऱ्याला कोणतेही बारा महिने म्हणजेच फळबाग लागवड करता येत नाही. हा मुद्दा खरा आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याने जर ठिबक सिंचनाच्या च्या सहाय्याने फळबागाची लागवड केली तर त्यासाठी जास्त पाणी लागणार नाही. यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी सिताफळाची लागवड केली आहे त्याच ठिकाणी पाणी देता येईल. आणि आपल्या पाण्याची जास्त नासाडी देखील होणार नाही.

माहितीनुसार सीताफळासाठी एक एकर शेती असेल तर तुमची विहीर किंवा बोर किमान दिवसातून दोन तास ठिबक वर चालू राहावा. आणि उन्हाळ्या दरम्यान एक तास जरी बोर किंवा विहीर चालू राहिली तरी देखील तुम्ही फळबागाची लागवड करू शकता. ठिबक वर जास्त प्रमाणात दाब येतो यामुळे आपली मोटार जास्त वेळ चालते. परंतु, तुम्ही जर मोकळे पाणी सोडले म्हणजे दंडाने किंवा वाफा करून पाणी सोडले तर तुम्हाला हे पाणी पुरणार नाही. केवळ ठिबक वर दोन तास सर्व पिकाला पाणी जाईल एवढे पाणी शेतकऱ्याकडे असावे. यामुळे आपल्या पिकाला चांगल्या प्रमाणात पाणी पडते. आणि पिकाची लागवड व्यवस्थित होते आणि उन्हाळ्यामध्ये आपले सीताफळ करपून जात नाहीत.

सिताफळ या पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी संपूर्ण माहिती?

सीताफळ या पिकाची लागवड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये मशागत करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला सर्वात अगोदर तुमची जमीन नांगरून घ्यावी लागेल त्यानंतर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात ढेकळे दिसली तर तुम्हाला ते ढेकळे फोडून घ्यावी लागतील. आणि ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर कुळवून उन्हामध्ये जमीन तापवून घ्यावी लागेल. म्हणजेच तापून द्यावे लागेल. आणि पावसाळ्याच्या तोंडावर सीताफळाची लागवड करण्यास सुरू करावी लागेल.

सिताफळाची लागवड करण्यासाठी दोन सीताफळांमधील अंतर किमान 12 फूट असावे. त्याचबरोबर एका सिताफळाचे झाड लावण्यासाठी 30 गुणिले 30 एवढे आकारमानाचे खड्डे घ्यावेत आणि या खड्ड्यांमध्ये एखादी टोपले शेणखत टाकावे. एखादी टोपले म्हणजेच किमान पाच ते सहा किलो शेणखत टाकावे. आणि तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही खताचा वापर करायचा असेल तर तुम्ही कृषी सेवा केंद्राला भेट देऊ शकता आणि त्यांच्याशी याबद्दल विचारू शकता.

सिताफळाच्या झाडाला कोणत्या वर्षात किती खत टाकावे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात

सिताफळाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी आपल्याला दहा किलोग्रॅम एवढे शेणखत सिताफळाच्या बुडाशी टाकावे लागणार आहे. त्याचबरोबर युरिया 100 ग्रॅम आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे देखील आपल्याला 150 ग्रॅम टाकावे लागणार आहे म्युरेट ऑफ पोटॅश हे देखील आपण 50 ग्रॅम सीताफळाच्या बुडाला पहिल्या वर्षी टाकू शकता.

त्याच बरोबर दुसऱ्या वर्षी आपल्याला शेणखताचा दर्जा वाढवावा लागणार आहे. दुसऱ्या वर्षी आपल्याला शेणखत वीस किलोग्रॅम एवढे टाकावे लागणार आहे आणि युरिया पहिल्या वर्षी जेवढा टाकला होता त्यापेक्षा 50 ग्रॅम जास्त टाकावा लागणार आहे. म्हणजेच आपल्याला युरिया 150 ग्रॅम टाकावा लागणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी डीएपी देखील शंभर ग्रॅम टाकावे लागणार आहे. यामुळे सीताफळाची वाढ चांगल्या प्रमाणात होते. आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे देखील 100 ग्रॅम सिताफळाला टाकावे.

त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी शेणखत हे 30 किलोग्रॅम एवढे टाकावे आणि युरिया 150 ग्रॅम टाकावा आणि डीएपी 150 ग्रॅम टाकावा आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे केवळ 100 ग्रॅम टाकावे या म्युरेट प्रमाण आपल्याला तीन वर्षे सारखेच टाकावे लागणार आहे.

यानंतर पुढील वर्षी म्हणजेच चौथ्या वर्षी शेणखत 50 किलोग्रॅम टाकावे लागणार आहे आणि युरिया 400 ग्रॅम टाकावा लागणार आहे आणि डीएपी 250 ग्रॅम टाकावा लागणार आहेआणि म्युरेट ऑफ पोटॅश याचे प्रमाण चौथ्या वर्षी वाढणार आहे म्हणजेच आपल्याला चौथ्या वर्षी म्युरेटऑफ पोटॅश 175 ग्रॅम सीताफळाला टाकावे लागणार आहे.

सिताफळाची काढणी कधी सुरू होते?

साधारणतः सिताफळाची काढणी ही तीन-चार वर्षापासून सुरुवात होते. विशेषता सिताफळाच्या झाडांना जून ते जुलै दरम्यान फुले येण्यास सुरुवात होते. आणि या कालावधीपासून तब्बल पाच महिन्यानंतर सिताफळाला फळ येण्यास सुरुवात होते. त्यानंतर तुम्ही म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात सीताफळ काढण्यासाठी तयार असते.

त्याचबरोबर तुम्ही जर असे संपूर्ण व्यवस्थापन व्यवस्थित केले तर तुम्हाला पाचव्या वर्षानंतर प्रत्येक झाडापासून तब्बल 25 ते 30 किलो सीताफळाचे उत्पन्न होऊ शकते. यापेक्षा जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी देखील काही पर्याय असतात हे पर्याय तुम्ही तुमच्या जवळील कृषी सेवा केंद्राला विचारू शकता.Cultivation information of sitafal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *