Thu. Jun 13th, 2024
Cotton managementCotton management

Cotton management: नमस्कार मित्रांनो, कापूस पिकाची लागवड ही देशभरातच नव्हे तर देशाबाहेर देखील केली जाते. त्याचबरोबर या कापसाला यावर्षी खूपच कमी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे सर्व शेतकरी मित्र नक्कीच नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु, मागील वर्षी कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात बाजार भाव मिळाला होता. म्हणजेच चांगला बाजार भाव मिळाला होता. परंतु मागील वर्षी बोंड अळीच्या प्रदुर्भावामुळे कापूस पिकाचे उत्पादन घटले होते. त्याचबरोबर यावर्षीही कमी पाऊस पडल्यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे.

मात्र तरी देखील यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळाला नाही. चला तर मग आपण या बातमीत पाहूया की कापूस पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे? याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. कापूस पिकाची लागवड करण्यासाठी कोणत्या वाणाची निवड करावी? कापूस पिकावर पहिली फवारणी कोणत्या औषधांची करावी? कापूस पिकामध्ये कोणते अंतर पीक घेता येते? कापूस पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असावे? याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

कापूस पिकाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात

आपल्या महाराष्ट्रभरात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर कापसाला महाराष्ट्रामध्ये पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते. त्याचबरोबर कापूस पिकाला राज्यातील दुसरे नगदी पीक म्हणून देखील ओळखले जाते. त्याचबरोबर 2020 नंतर ठिबक सिंचन च्या मदतीने कापूस पिकाचे लागवड योग्य पद्धतीने तसेच पाणीपुरवठा योग्य झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळपास काही शेतकरी प्रति एकही 15 ते 16 क्विंटल देखील कापूस पिकाचे उत्पादन घेत आहेत. यामुळे कापसाला पांढरे सोने म्हणून शेतकरी ओळखत आहेत.

कापूस पिकाची लागवड करण्यासाठी कोणत्या वाणाची निवड करावी

शेतकरी मित्रांनो, देशभरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कापसाला मागणी वाढली आहे. यामुळे कापूस पिकाचे उत्पन्न वाढावे यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहेत. त्याचबरोबर कापसाचे वाण देखील बाजारामध्ये दाखल झाले आहेत. शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम आपण सुधारित आणि संकरित कापूस पिकाच्या वाणाची निवड करणे महत्त्वाचे असते.

कापसाच्या सुधारित वाणाची माहिती पुढीलप्रमाणे पाहूया:- 1) अमेरिकन- LRA 5166,JLH 168 आणि फुले 668

त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये कापसाच्या विविध जाती असतात. त्यामधील कोणत्याही जातीची लागवड केली तरीदेखील आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते.

कापूस पिकाची लागवड झाल्यानंतर खत व्यवस्थापन कसे करावे

शेतकरी मित्रांनो, कापूस पेरणीनंतर कापसाचे खत व्यवस्थापन करणे देखील खूप महत्त्वाचे असते. चला तर मग कापसाचे लागवड झाल्यानंतर कापसाचे खत व्यवस्थापन कसे असते याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

कापूस पिकाला 120: 60: 60 किलोग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद आणि पालाश प्रती हेक्टरी द्यावे. यामुळे आपल्या कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. त्याचबरोबर कापसाची उंची झटपट वाढते.

त्याचबरोबर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये कोरडवाहू या ठिकाणी लागवड केलेल्या बीटी कापसाला प्रति एकरी 48 किलोग्रॅम नत्र, 24 किलोग्रॅम स्फुरद आणि त्याचबरोबर पालाश हे देखील 24 किलोमीटर द्यावे. यामुळे देखील आपल्या कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात होते.

कापूस पिकाचे पाणी व्यवस्थापन देखील खूप गरजेचे असते

चला तर मग मित्रांनो कापूस पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. आपल्याला तर माहीतच आहे की कापूस पिकाची लागवड ही पावसाळ्यामध्ये म्हणजेच खरीप हंगामातील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान घेतले जाते. म्हणजेच या कालावधीत पावसाळा हा ऋतू सुरू असतो. आणि या ऋतूमध्ये पाऊस कधीही पडू शकतो.

यामुळे कापूस पिकाला पावसाळ्यामध्ये पाण्याचे कोणतेही आवश्यकता नसते. परंतु ज्या वेळेस पाऊस खंड निर्माण करतो त्यावेळेस कापूस पिकाला पाणी देणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर पाणी हे ठिबकच्या सिंचनच्या सहाय्याने दिल्यानंतर आपल्या शेतामध्ये तणाची जास्त प्रमाणात निर्मिती होत नाही. त्याचबरोबर आपल्या कापूस पिकावर कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही.

त्याचबरोबर, आपण जर दंड करून पाणी कापूस पिकाला सोडले तर शेतामध्ये जास्त प्रमाणात तन उगते आणि त्याचबरोबर आपल्याला कापूस पिकाला पाणी देण्यासाठी जास्त कालावधी लागतो. परंतु आपण जर ठिबक सिंचन द्वारे पाणी व्यवस्थापन केले तर आपल्याला कमी वेळेत पाणी देणे होते. आणि आपल्या कापूस पिकावर कोणताही रोग होत नाही.

त्याचबरोबर आपल्याला ठिबक सिंचन साठी सरकारकडून देखील अनुदान मिळते. राज्यांमध्ये तसेच देशामध्ये ठिबक सिंचनचा उपयोग वाढवावा यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. ठिबक सिंचन साठी सरकारकडून शेतकऱ्यांना तब्बल 80 टक्के अनुदान दिले जाते. मात्र यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज यशस्वी आहे की नाही हे समजते.

शेतकऱ्याचा अर्ज जर यशस्वीपणे स्वीकारला गेला तर शेतकऱ्यांना पहिल्यांदी दुकानांमधून ठिबक सिंचन ची खरेदी करावी लागते. त्यानंतर ठिबक सिंचन शेतामध्ये टाकून शेतामध्ये एखाद्या पिकाची लागवड करावी लागते. त्यानंतर काही महिन्यांनी शासनाचे अधिकारी ठिबक सिंचन ची पाहणी करण्यासाठी येतात. त्याचबरोबर ठिबक सिंचन ची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्याला दोन ते तीन महिन्यांनी ठिबक सिंचनचे अनुदान मिळते.

त्याचबरोबर तुम्ही जर या योजनेसाठी अपात्र ठरलात तर तुम्ही पुढील पाच वर्षानंतर या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला होता आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत ठिबक मिळाले असेल तरी देखील तुम्ही या योजनेत पुन्हा पाच वर्षांनी अर्ज करू शकता. यामागे कारण म्हणजे ठिबक सिंचन खराब होण्याचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो असे गृहीत धरून सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे.Cotton management

ठिबक सिंचन चा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर किंवा शेततळे किंवा बोर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्याला ज्या वर्षी ठिबक सिंचन चा लाभ घ्यायचा आहे. त्यावर्षी शेतकऱ्याने दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. यामुळे ठिबक सिंचन चा फॉर्म अपात्र देखील ठरवला जाऊ शकतो.

कापूस पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन कसे करावे? संपूर्ण माहिती

कापूस पिकावर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो? याबद्दल माहिती आपण पुढील प्रमाणे बघुयात…1) बुरशीजन्य करपा 2) जिवाणूजन्य करपा 3) मर व मूळकज 4) मावा 5) फुलकिडे 6) पांढरी माशी 7) पिठ्या ढेकूण 8) बोंड आळी

वरी जिल्हा विविध किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव कापूस पिकावर होत असतो. त्याचबरोबर या रोगावर नियंत्रण करावे यासाठी कृषी सेवा केंद्र मध्ये संपूर्ण माहिती मिळते. यामुळे कोणत्या रोगावर कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी याबद्दलची माहिती या बातमीत आम्ही देत नाहीत. यामागील कारण म्हणजे कृषी सेवा केंद्र मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे औषधे उपलब्ध असतात.

त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. कापूस वेचणी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी चांगला कापूस फुटून द्यावा आणि त्यानंतर एकाच वेळी चांगल्या प्रमाणात कापूस वेचून घ्यावा. मात्र यामुळे तोटे देखील होतात. यामुळे आपल्या शेतामध्ये कापूस तळतो आणि अवकाळी पाऊस जर आला तर या पावसामुळे आपला कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकऱ्याने आपल्या सोयीनुसार कापूस वेचणी करावी.

कापूस पिकाची लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर कापूस पिकाची वेचणी सुरू होते. असा प्रश्न अनेक नवीन शेतकऱ्यांना पडत असेल?… परंतु अनेक शेतकऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर देखील माहित असेल. कापूस लागवडी नंतर चार ते पाच महिन्यानंतर वेचणी सुरू होते.

कापूस पिकाची लागवड करून शेतकरी किती नफा कमवू शकतात?

कापूस पिकाची लागवड करून शेतकरी प्रति एकरी 50 ते 60 हजार रुपये नफा कमवू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर चांगल्या प्रकारे कापूस पिकाचे व्यवस्थापन केले तर शेतकरी 70 ते 80 हजार रुपये कमवू शकतात.

टीप: ही माहिती प्राथमिक माहिती आहे. यामुळे या माहितीच्या आधारे तुम्ही कोणताही इतर प्रयोग करू नये. त्याचबरोबर कोणताही प्रयोग करणे अगोदर तुमच्या जवळच्या तज्ञांशी संपर्क साधा.Cotton management

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *