Thu. Jun 13th, 2024
Complete information on Papaya cultivationComplete information on Papaya cultivation

Complete information on Papaya cultivation: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये पपई लागवड याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही माहिती खूपच तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

आज आपण या बातमीत कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात. या बातमीत आपण 1) पपई लागवड करण्यासाठी जमीन कशी असावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. 2) पवई लागवडीसाठी हवामान कसे असावे याबद्दलही माहिती पाहणार आहोत. 3) पपई लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत.

4) पपईची योग्य लागवड कोणती असते याबद्दल माहिती पाहणार आहोत. 5) पपई साठी पाणी व्यवस्थापनाची माहिती पाहणार आहोत. 6) पपई मध्ये अंतर मशागत कसे करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. 7) पपईची काढणी आणि विक्री याबद्दलही माहिती या बातमीत पाहणार आहोत. मित्रांनो आपण या पद्धतीने पपया लागवड ची माहिती पाहणार आहोत.

पपई लागवड साठी कोणती जमीन योग्य असते

शेतकरी मित्रांनो पपई लागवड करण्यासाठी तुम्ही कोणती जमीन वापरता हे देखील खूप महत्त्वाचे असते. पपई लागवड करण्यासाठी तुम्ही उत्तम निजऱ्याची त्याचबरोबर सुपीक आणि मध्यम काळी जमीन वापरू शकता त्याचबरोबर तांबडी पोयट्याची जमीन देखील पपई लागवडीसाठी योग्य असते. यामुळे तुम्ही ही जमीन देखील पपई लागवड करण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर मित्रांनो पपया लागवड करण्यासाठी जांभ्या खडकाच्या जमिनीचा देखील वापर तुम्ही करू शकता.Complete information on Papaya cultivation

कोणत्या जमिनीत आणि कशा पद्धतीने पपईची लागवड करू नये?

शेतकरी मित्रांनो, पपईची लागवड ही चुनखडी व खडकाळ जमिनीत लागवड करू नये. परंतु तुम्ही जर या जमिनीत पपईची लागवड केली तर तुमच्या पपईची झाडे चांगल्या प्रकारे वाढणार नाहीत. त्याचबरोबर पपईच्या झाडांची मुळे जमिनीत जाण्यासाठी योग्य जमीन नसल्यामुळे आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पपई देखील करू शकते. यामुळे तुम्ही पपईची लागवड चुनखडी व खडकाळ जमिनीत करू नये.

पपई लागवडीसाठी हवामान कसे असावे?

पपईचे झाड हे लावण्यासाठी जमिनी बरोबरच हवामान कसे असावे ही माहीत असणे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहे. शेतकऱ्यांनो पपईची लागवड करताना वातावरण हे उष्ण असावे. यामागील कारण म्हणजेच पपईची वाढ ही उष्णकटिबंधात होत असते. तुम्ही जर पपईची लागवड हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात केली तर तुमच्या पपईची वाढ होऊ शकत नाही. शेतकरी मित्रांनो माहितीनुसार, पपई पिकाची लागवड ही 15 ते 30 अंश से. ग्रे. मध्ये करावी. यामुळे तुमच्या पपईची वाढ ही झपाट्याने होते. आणि तुमच्या उत्पन्नात वाढ देखील होते.

मित्रांनो, पपईच्या झाडाला कडाक्याची थंडी आणि वादळी वारे हे हानिकारक असतात. अशा पद्धतीचे वातावरण तयार झाल्यावर पपई पिकाचे उत्पन्न घटू शकते. त्याचबरोबर पपई पिकाची या वातावरणात वाढ देखील होत नाही.

पपई पिकाची लागवड करण्यासाठी कोणत्या जातीचा वापर करावा?

पपई लागवड करण्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या जातींचा उपयोग केला जातो. त्याच बरोबर पपईच्या लागवडीसाठी अनेक जाती देखील विकसित करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडे पपईची लागवड करण्यासाठी कोणती जात निवडावी यासाठी अनेक पर्याय आहेत. चला तर मग पपईच्या कोणत्या जाती सर्वात चांगले आहेत याबद्दल माहिती पाहुयात.

पपई पिकाच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत:- 1. को-5 को-6 पुसा ड्राफ या जातीच्या पपईची लागवड केल्याने तुमचे उत्पन्न अधिक होऊ शकते.

2. पुसा नन्हा :- पपईची ही जात देखील खूपच उत्कृष्ट आहे. या जातीच्या पपईवर जास्त प्रमाणात रोगराई होत नाही. आणि शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळते.

3. पुसा जायंट :- पपईची ही जात कमी पाण्यावर उगण्यास सक्षम आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या जातीच्या पपईची लागवड देखील करावी. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

पपईची लागवड कशा पद्धतीने करावे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

पपईची लागवड केव्हा करावी हे तुम्हाला आम्ही वरील माहिती सांगितले आहे. त्याचबरोबर पपईच्या कोणत्या जातींची लागवड करावी हे देखील तुम्हाला आम्ही सांगितले आहे आता आम्ही तुम्हाला पपईची लागवड कशा पद्धतीने करावी. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पपईची लागवड ही करण्यापूर्वी तुमच्या शेत जमिनीची आडवी आणि उभी नांगरणी करावी. नांगरणी झाल्यानंतर कुळव्याच्या बाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावेत. किंवा तुम्ही तुमच्या शेतात रोटावर देखील मारू शकता. यामुळे तुमच्या शेतातील ढेकळांचा चुरा होईल.

ढेकळांचा चोरा बारीक झाल्यानंतर तुम्ही जमीन सपाट करावी. जमीन सफर झाल्यानंतर 2.2542.25 मीटर एवढ्या अंतरावर पपई पिकाची लागवड करावी. किंवा मित्रांनो 2.5042.00 एवढ्या अंतरावर देखील पपईची लागवड तुम्ही करू शकता.

पपईची लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन कसे असावे?

पपईची लागवड करण्या अगोदर देखील आपल्याला पपईसाठी खत व्यवस्थापन करावे लागते. यामुळे शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की पपई लागवड करण्याअगोदर तुम्ही ज्या जमिनीच्या क्षेत्रात पपईची लागवड करत आहात त्या क्षेत्रात शेणखत हे 20 मे. टन. जमीन टाकावे. त्याचबरोबर हे खत सगळीकडे व्यवस्थित पागावे. यानंतर मित्रांनो पपईची लागवड केल्यानंतर सारख्याच चार हप्त्यांमध्ये स्फुरद व पालाश टाकावे. यामुळे पपई पिकाची वाढ व्यवस्थित होते आणि रोगराई कमी होते. या पद्धतीने खताचे व्यवस्थापन केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

शेतकरी मित्रांनो पपईसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे संपूर्ण माहिती पाहूयात…

शेतकरी मित्रांनो पपईची लागवड केल्यानंतर लगेच एक दोन दिवसात पपईला चांगल्या प्रमाणात पाणी द्यावे. त्याचबरोबर मित्रांनो, हिवाळा सुरू झाल्यानंतर पपई पिकाला दर दहा दिवसांनी योग्य पद्धतीने पाणी द्यावे. त्याचबरोबर पाण्यामुळे पपई पिकापाशी तन उगले असेल तर त्याची खुरपणी करणे खूप गरजेचे असते. किंवा त्या ठिकाणी तुम्ही कोळपणी देखील करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळा चालू झाल्यानंतर तुम्ही पपई पिकाला दर सात दिवसांनी पाणी द्यावे.

पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा:- व पहिला पाणी देताना तुम्ही दुहेरी आले पद्धती वापरू शकता किंवा शेतात सरी पाडून देखील पपईला पाणी देऊ शकता. किंवा चालू काळात नवीन आलेल्या पद्धतीने नुसार म्हणजेच ठिबक सिंचन द्वारे देखील तुम्ही पपई पिकाला पाणी देऊ शकता. यामधील ठिबक सिंचन या पद्धतीने तुम्ही जर पपईला पाणी दिले तर तुमच्या शेतात कमी प्रमाणात तन उगते यामुळे तुम्हाला खुरपणी जास्त करावी लागत नाही. आणि तुमचा खर्च वाचतो. यामुळे तुम्ही पपई लागवड करताना ठिबक सिंचन नक्की करून घ्या.

पपई पिकामध्ये अंतर मशागत कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात

पपई पिकामध्ये अंतर मशागत कशी करावी हे माहीत असणे खूप गरजेचे असते. कारण अंतर मशागत पपईच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करते. त्याचबरोबर अंतर मशागतीमुळे उपयुपीकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पपई बागा खाली उरलेले दिसले की खुरपणी करून घ्यावी. त्याचबरोबर बागेमध्ये केवळ दहा टक्के नर झाडे ठेवावे. इतर सर्व नर झाडे उकडून टाकावीत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पपई पिकाची लागवड जर दाट झाली असेल तर वेळणी तात्काळ करून घ्यावी.

पपई पिकांच्या फळांची काढणी व विक्री कशी असावी?

शेतकरी मित्रांनो पपई लागवडीनंतर किमान तीन ते सात महिन्या दरम्यान पपईला फुले येतात. त्यानंतर मित्रांनो तब्बल तीन ते चार महिन्यानंतर पपई पिकाची फळे काढणे योग्य होतात. परंतु हे लक्षात ठेवा की पपई पिकातून जर दुधासारखा चीक येत असेल तर पपई काढणे योग्य झालेली नाही.

ज्यावेळेस पपई पिकातून पाण्यासारखा चीक निघेल त्यावेळेस तुम्ही पपई काढू शकता. त्याचबरोबर मित्रांनो पपई पिकाच्या फळावर पिवळा डोळा आला असेल तर तुम्ही पपई पिकाची काढणी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो पपईची पिकाची फळे तुम्हाला जर जास्त लांब निर्यात करायचे असतील तर पपई हे पीक टोकाकडील बाजूस पिवळसर होताच काढावे. यामुळे पपई जास्त दिवस टिकून राहते. आणि पपई जर आदळली तर त्यावर कोणताही परिणाम होत नाही.Complete information on Papaya cultivation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *