Thu. Feb 22nd, 2024
chiku lagavadchiku lagavad

chiku lagavad: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत चिकू या फळबागाची लागवड करून शेतकऱ्याने कशा पद्धतीने महिन्याला लाखो रुपये कमवावे? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, चिकू लागवड करण्यासाठी कोणत्या रोपांची निवड करावी? त्याचबरोबर चिकू लागवडीपूर्वी शेतामध्ये कशा पद्धतीने मशागत करावी? चुकू लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे? चिकू लागवड करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या प्रकारची माती असावी? असे संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

 

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फळ लागवड करून महिन्याला लाखो रुपये कमवायचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही चिकू या फळबाग लागवडीतून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला तब्बल तीन ते चार वर्ष खूप मेहनत घ्यावी लागेल. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला खर्च देखील करावा लागेल.

त्याचबरोबर चिकू लागवड करण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या प्रकारे पाणीसाठा असणे देखील खूप गरजेचे असते. जर तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात पाणीसाठा असेल तरच तुम्ही चुकू या पिकाची लागवड करू शकता. कारण चुकून या पिकासाठी जास्त प्रमाणात उन्हाळ्यात पाणी लागते. आणि तुमच्याकडे उन्हाळ्यात जर पाणीसाठा उपलब्ध असेल तर तुमची चिकूची रोपे करपून जाऊ शकतात.

त्याचबरोबर मित्रांनो चिकू हे एक खूपच गोड आहे चविष्ट फळ आहे. त्याचबरोबर या फळासाठी बाजारात देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामुळे या फळाची लागवड करून शेतकरी देखील कमी वेळेत लखपती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या शेती पिकातून अनेक शेतकऱ्यांना नुकसान देखील सोसावे लागले आहे. यामागील कारण म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन नसणे.

कारण ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा उपलब्ध साठा नाही त्या शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करणे चुकीचे आहे. एखादा उन्हाळा एखाद्या शेतकऱ्याला पाणीसाठा पुरवू शकतो परंतु त्यानंतर वरून राजाने जर अवकृपा दाखवली आणि राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्या शेतकऱ्याने पाणी कुठून आणावे असा प्रश्न नक्कीच उद्भवतो. यामुळे त्या शेतकऱ्याला दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर चिकूचा फळबाग करपताना बघावा लागतो.

चिकू पिकाची लागवड करण्याअगोदर शेतीमध्ये कशा पद्धतीने मशागत करावी?

शेतकरी मित्रांनो चिकूची लागवड करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये अगोदरच शेतीमध्ये नागरणी करणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर नांगरणी झाल्यानंतर शेतीमध्ये कुळवणे करून जमीन भुसभुशीत करावी. यामुळे चिकूची वाढ होण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर चिकूची लागवड करण्यासाठी दहा बाय दहा या पद्धतीने एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत.chiku lagavad

यानंतर शेतकरी मित्रांनो, चिकू हे पीक निरोगी रहावे आणि त्याचबरोबर या पिकातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी आपण या खोदलेल्या खड्ड्यामध्ये पोयटा माती त्याचबरोबर 3 ते 6 किलो शेणखत टाकावे. त्याचबरोबर मित्रांनो शक्य झाले तर एका खड्ड्यात एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे..

 

चिकू पिकाची लागवड कोणत्या महिन्यामध्ये करावी?

शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की, कोणत्याही पिकाची लागवड करताना आपल्याला त्या पिकाची लागवड कोणत्या महिन्यांमध्ये करणे आवश्यक आहे. याबद्दलची सविस्तर माहिती असणे खूप गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चिकूची लागवड ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात केली जाते. त्याचबरोबर या महिन्यात चिकूची लागवड केली नाही तर आपल्याला पुढील भविष्यात संकटांचा सामना करावा लागतो.

चिकूची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी संपूर्ण माहिती…

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चिकूची लागवड करताना आपल्याला विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. तुम्ही आलेल्या रोपट्यांना जमिनीमध्ये खड्डे खाल्ल्या ठिकाणी व्यवस्थित लावणे खूप गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो तुम्ही आले का कलम हा खड्ड्यात लावताना मध्यभागी लावा. त्याचबरोबर कलमाचा काहीसा भाग जमिनीच्या वर राहील अशा पद्धतीने कलम लावा.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण लावलेला कलम जरा थोड्याफार प्रमाणात तिरका लागला तर त्याला काठीचा आधार द्यावा. आणि आपण सर्व कलम पूर्णपणे लावल्यानंतर लगेच चिकू च्या झाडाला पाणी सोडावे.

चिकूच्या झाडाला कशा पद्धतीने वळण द्यावे? आणि चिकूची छाटणी कशी करावी? संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो आपण जर चिकूचे झाड जसे मोठे होईल तसे मोठे होऊ दिले. तर ते आपल्यासाठी खूपच धोकादायक असू शकते. यामुळे आपण चिकूच्या झाडाची नियमित छाटणी करणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर छाटणी कशी करावी याची माहिती तुम्हाला तर माहीतच असेल, म्हणजेच शेतकरी मित्रांनो झाडे हे जास्त उंच जाऊ नये, त्याचबरोबर झाड हे खूपच बारीक देखील राहू नये याची काळजी घ्यावी.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, झाडाची छाटणी करताना सुरुवातीला काही दिवस जमिनीपासून पन्नास सेंटीमीटर पर्यंत येणारे सर्व बारीक बारीक कोम छाटून टाकावेत. त्याचबरोबर झाड जस जसे मोठे होईल तस तशी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते.

चिकूचे खात व्यवस्थापन कसे करावे संपूर्ण माहिती

चिकूच्या झाडाला खत देणे खूप गरजेचे असते. यामुळे चिकूच्या झाडाची वाढ झपाट्याने होते. यामुळे आपण चिकूच्या झाडाला व्यवस्थित खत पाणी देणे खूप गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला चिकूच्या झाडापासून लवकरात लवकर उत्पादन घेण्यासाठी चिकूच्या झाडाला खत व्यवस्थापन दोन समान टप्प्यात विभागून देणे आवश्यक असते.

चिकूच्या झाडाला साधारणता शेतकऱ्यांनी सप्टेंबर किंवा जून या महिन्यादरम्यान खत देणे आवश्यक असते. त्याचबरोबर या खतामध्ये तुम्ही शेणखताचा जास्तीत जास्त उपयोग करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो या मध्ये तुम्ही दुसऱ्या विविध खतांचा उपयोग देखील करू शकता. मात्र यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

चिकूच्या झाडाला पाणी व्यवस्थापन कसे करावे?

चिकूच्या झाडाला नियमित पाणी देणे देखील खूप गरजेचे असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांना आपण ज्यावेळी चिकूच्या झाडाला खत टाकतो त्यानंतर पुढील दिवशी किंवा त्याच दिवशी चिकूच्या झाडाला पाणी सोडणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या प्रमाणात उत्पादन घ्यायचे असेल तर तुम्ही चिकूच्या झाडाला नियमित पाणी द्यावे.

त्याचबरोबर मुख्यतः चिकूच्या झाडाला फुलोरा लागण्याच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते. यावेळी चिकूचा झालेला जास्तीत जास्त पाणी द्यावे. त्याचबरोबर ज्यावेळी या फुलापासून फळाचे रूपांतर होते त्यावेळी देखील चिकूच्या झाडाला जास्तीत जास्त पाणी द्या. यामुळे तुमच्या चिकूच्या झाडाला येणाऱ्या फळाचा आकार मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि यामुळे तुम्हाला या झाडापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळते.

चिकू पिकांमध्ये कोणकोणते अंतर पिके घेता येतात?

चिकूच्या पिकामध्ये आपण कोणती आंतरपिके घेऊ शकतो. चिकूच्या पिकाची वाढ सुरुवातीच्या काळामध्ये हळूहळू प्रमाणात होते. यामुळे तुम्ही या काळात चुकूच्या पिकामध्ये आंतर पिके घेऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो, चिकूच्या पिकामध्ये तुम्ही कोण कोणत्या प्रकारचे आंतरपीके घेऊ शकता असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर खूपच सोपे आहे. मित्रांनो तुम्ही चिकूच्या पिकामध्ये कोणकोणते अंतर किती घेऊ शकता याची यादी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.

  1. टोमॅटो
  2. मिरची
  3. वांगी
  4. कोथिंबीर
  5. कोबी
  6. लिली
  7. निशिगंध
  8. भुईमूग
  9. हरभरा

अशा विविध पिकांची तुम्ही चिकूच्या फळ बागांमध्ये लागवड करू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या फळाची लागवड केल्यानंतर तुम्हाला काही दिवस यापासून उत्पादन मिळत नाही. मात्र ज्या दिवशी या चिकूचा झाडापासून तुम्हाला उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. त्या दिवसापासून तुमच्या कष्टाचा एक एक रुपया तुम्हाला मिळत जातो.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चिकूच्या झाडाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर तुम्हाला साधारणतः महिन्याला हो गया उत्पादन होऊ शकते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या पिकातून कमी प्रमाणात उत्पादन निघत असेल तर तुम्ही यासाठी खत व्यवस्थापन आणखीन वाढू शकता. आणि दरवर्षी जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या चुकवशी विक्री तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गावातला बाजारामध्ये देखील या चिकूची विक्री करू शकता…chiku lagavad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *